आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमरावती:क्रूरतेचा कळस, दीड महिन्याच्या बाळाला फेकले विहिरीत; सकाळी तरंगताना दिसला मृतदेह

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील न्यू प्रभात कॉलनीत वडिलांकडे बाळंतपणासाठी आलेल्या एका महिलेचे अवघ्या दीड महिन्यांचे बाळ रविवारी (दि. २९) दुपारपासून बेपत्ता होते. सुरूवातीला बाळाचे अपहरण झाले असा अंदाज होता. दरम्यान सोमवारी (दि. ३०) सकाळी घरातील विहिरीतच चिमुकल्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. समाजमन हेलावून टाकणाऱ्या या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. बाळाला विहीरीत टाकणाऱ्या आरोपीचा अद्याप शोध लागला नाही मात्र क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या त्या मारेकऱ्याचा पोलिस कसोशीने शोध घेत आहेत.

ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेले एएसआय दिलीपसिंग चौहान यांचे न्यू प्रभात कॉलनीमध्ये घर असून त्यांच्या नम्रता या मुलीने दिड महीन्यांपूर्वी एका गाेंडस बाळाला जन्म दिला होता. नम्रताचे सासर बिहारमध्ये आहे. रविवारी दुपारी दिलीपसिंग चौहान व परिवारातील सदस्य एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी नम्रता व नम्रताचा भाऊ प्रणव हे दोघेच घरी होते. दुपारी दीड वाजताच्या सुमारास नम्रताने मुलाला बेडरुममध्ये ठेवले व त्या दुसऱ्या खोलीत गेल्या. काही वेळानंतर जाऊन पाहिले असता बाळ खोलीत नव्हते. त्यामुळे प्रणव व नम्रता यांनी बाळाचा सर्वत्र शोध घेतला मात्र बाळ मिळाले नाही. राजापेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरुध्द खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांंनी सुरू केली चौकशी
या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी सोमवारी सांयकाळी मृत बाळाच्या एका नातेवाईकाला चौकशीसाठी ठाण्यात बोलावले असून चौकशी सुरू केली आहे. अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser