आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती मागील दहा दिवसांपासून अवकाळी पावसाची संततधार सुरू असून, दरदिवशी कोणत्या तरी भागात कोसळून पिकांचे नुकसान सुरू आहे. दरम्यान ३ मे रोजी अचलपूर तालुक्यात पुन्हा एकदा पाऊस बरसला आणि २११ हेक्टरमधील कांदा आणि गहू पिकाचे नुकसान झाले आहे.
दरम्यान सध्या असलेल्या पावसाळी वातावरणामुळे गुरूवारी (दि. ४) शहरात पारा ३३.५ अंश होता. दरवर्षी मे महिन्यात जिल्ह्यात उन्हाचा कहर सुरू असतो. दरदिवशी तापमान ४५ अंश किंवा त्यापेक्षा अधिक राहते. मात्र, यावर्षी मागील दहा दिवसांपासून दरदिवशी ढगाळ वातावरण आणि पावसाळ्याप्रमाणे अधूनमधून पावसाच्या सरी वादळासह हजेरी लावत आहे. त्यामुळे सध्या दिवसाचा पारा ३३ अंशाच्या आसपास आहे. सततच्या या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे तसेच पशुधनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे याचवेळी घरांचेही नुकसान झाले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.