आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती पोलिसांची धडक कारवाई:शहरात विक्रीसाठी आणलेले 23 चायना चाकू जप्त; 500 रुपयांना करत होता विक्री

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात मागील काही दिवसांपासून झालेले खून व प्राणघातक हल्ल्यांच्या गुन्ह्यात बहूतांश चायना चाकूंचा वापर होत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी या चाकूंची विक्री कोण करते, याबाबत माहीती काढली. दरम्यान शनिवारी (दि. 3) उशिरा रात्री पोलिसांनी ग्राहक बनून शहरातील पठाणपुऱ्यातील एका तरुणाच्या घरी धाड टाकली. त्यावेळी पोलिसांना धारदार 23 चायना चाकू जप्त करण्यात यश आले. यावेळी चाकूची अवैध विक्री करणाऱ्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. चाकू विक्री करणाऱ्याकडून एकाचवेळी मोठ्या संख्येत चाकू जप्तीची शहरात अलीकडे झालेली ही पहीलीच कारवाई आहे.

सैय्यद आमीन सैय्यद सादीक (23, रा. पठाणपुरा, अमरावती) असे पोलिसांनी पकडलेल्या चायना चाकू विक्रेत्याचे नाव आहे. सैय्यद आमीन हा शहरात मागील दोन ते तीन महिन्यांपासून अवैधपणे चायना चाकू विक्री करत असल्याची माहीती गुन्हे शाखेचे पीएसआय नरेशकुमार मुंडे यांना मिळाली होती. त्यामुळे पोलिस त्याच्या मागावर होतेच. दरम्यान शनिवारी रात्री पीएसआय मुंडे यांच्या पथकातील दोन पोलिसांनी ‘डमी’ ग्राहक बनून सैय्यद आमीनसोबत सपंर्क केला व आम्हाला दोन चाकू हवे असल्याचे सांगितले. ग्राहक असल्यामुळे आमीनसुध्दा त्यांच्यासोबत बोलला. दरम्यान शनिवारी उशिरा रात्री त्याने ग्राहक बनलेल्या पोलिसांना नागपूरी गेट ठाण्याच्या हद्दीतील जाकीर कॉलनीतील मनपा बगिच्याजवळ चाकू घेण्यासाठी बोलवले. यावेळी पोलिस पोहचले आणि तोसुध्दा चाकू घेवून आला.

पोलिसांनी त्याच्याकडून चाकू घेतले, त्याचवेळी त्याला ताब्यात घेवून त्याची घरझडती घेतली. त्यावेळी पोलिसांनी 22 चायना व एक गावठी असे एकूण 23 चाकू त्याच्या खोलीतून जप्त केले आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या प्रत्येक चायना चाकूचे पाते 10 इंच लांबीचे आहेत तसेच त्यामध्ये लाईटसुध्दा लागताे. या सर्व चाकूंना लाल रंगाचे कव्हरसुध्दा होते. पोलिसांनी हे 23 चाकू जप्त करुन सैय्यद आमीनला अवैध शस्त्र विक्री प्रकरणी अटक केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पीआय अर्जुन ठोसरे, पीएसआय नरेशकुमार मुंडे व त्यांच्या पथकाने केली आहे.

मुंबई व हैद्राबादवरुन आणायचा चाकू

सैय्यद आमीनला पोलिसांनी अटक केल्यानंतर किती दिवसांपासून ही विक्री करतो व कोणत्या ठिकाणाहून चाकू आणतो, याबाबत सखोल चौकशी केली. त्यावेळी त्याने सांगितले कि, कधी मुंबई तर कधी हैद्राबादवरुन हे चाकू आपण विक्रीसाठी आणतो. एक चाकू चिल्लर विक्रीमध्ये 500 रुपयांना तो विकत होता.

बातम्या आणखी आहेत...