आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक वारसा पाहण्याची संधी:अमरावतीकरांना दक्षिणेत धार्मिक पर्यटनाची संधी‎, भविष्यात एसी ट्रेन,‎ बडनेरातूनही प्रारंभ‎

अमरावती17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती‎ निसर्ग भ्रमण, हवाई यात्रा, जहाजातील‎ प्रवास अशा वेगवेगळ्या संधी उपलब्ध‎ करुन देणाऱ्या भारतीय रेल्वेने‎ (आयआरसीटीसी) आता धार्मिक‎ स्थळांच्या दर्शनाचीही सोय उपलब्ध‎ करुन दिली आहे.

या सोयीचे वैशिष्ट्य‎ असे की यामध्ये अमरावतीकरांना‎ सहभागी होण्याची संधी असून, नव्या‎ कोऱ्या रेल्वेने ते दक्षिणेतील मंदिरे व‎ तेथील सांस्कृतिक व धार्मिक वारसा‎ बघू शकतील.‎

संकेतस्थळावर करता येईल बुकींग

रेल्वेचा पर्यटन विभाग‎ सांभाळणाऱ्या सह महाव्यवस्थापक‎ डॉ. क्रांती सावरकर यांनी गुरुवारी येथे‎ माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.‎ यावेळी त्यांनी सांगितले की, २५ मे‎ रोजी ही पहिली रेल्वे गाडी वर्धा‎ नजिकच्या सेवाग्राम रेल्वे स्टेशनवरुन ‎ ‎रवाना होत असून, ७ रात्री व ८‎ दिवसांची सहल संपवून १ जून रोजी ‎परतणार आहे. यासाठी ऑनलाइन ‎बुकींगची सोय उपलब्ध असून, पर्यटक ‎आयआरसीटीसीचे संकेतस्थळ ‎ ‎ www.irctct ourism.com वर‎ बुकींग करु शकतात.

या धार्मिक ‎पर्यटनामध्ये रामेश्वरम, मदुरई, तिरुपती‎ आणि श्रीसैलम-मल्लिकार्जुन‎ ज्योतीर्लिंगाचे दर्शन करता येईल. ही‎ रेल्वे ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’‎ योजनेंतर्गत महिन्यातून एकदा धावेल.‎ यात ७२० प्रवाशांना सहभागी होता‎ येणार आहे. या प्रवासासाठीची ही‎ रेल्वेगाडी छत्तीसगढमधील बिलासपूर‎ येथून प्रारंभ होणार असून, भाटापारा,‎ तिल्दा नोरा, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव,‎ गोंदिया, तिरोडा, भंडारा, नागपूर,‎ सेवाग्राममार्गे जाईल. आठवडाभराच्या‎ प्रवासादरम्यान प्रवाशांची भोजन,‎ नाश्ता, चहापाणी व राहण्याची सोय‎ रेल्वेतर्फे केली जाणार आहे.‎ अधिकाधिक अमरावतीकरांनी या‎ संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही‎ डॉ. सावरकर यांनी केले आहे. यावेळी‎ भुसावळचे रेल्वे स्टेशन अधिकारी‎ केशव पाटणकर, प्राचार्य डॉ. संजय‎ खडसे आदी मान्यवर उपस्थित होते.‎

एसीचीही व्यवस्था

अमरावती हे मूळ गाव असलेल्या‎ रेल्वेच्या सह महाव्यवस्थापक डॉ.‎ क्रांती सावरकर यांनी या‎ शहरासाठीच्या योगदानासंदर्भातही‎ वाच्यता केली. त्यांच्यामते ही रेल्वे‎ स्लीपर कोच आहे. परंतु भविष्यात ती‎ एसी असण्यासोबतच मुंबई-हावडा‎ रेल्वे मार्गावरील बडनेरा स्टेशनवरून‎ ती धावेल, अशीही व्यवस्था केली‎ जाणार आहे. त्यांच्यामते एक‎ अमरावतीकर म्हणून मी स्वत: ही‎ व्यवस्था करण्याचा आटोकाट प्रयत्न‎ करणार आहे.‎