आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत 'चला जाणुया नदी'ला अभियान:नद्यांचे पुनर्जीवन होण्यासाठी विशेष संवाद यात्रेचे आयोजन

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नद्यांमधून विषारी पाणी नव्हे, तर अमृततुल्य पाणी वाहिले पाहिजे. यासाठी नद्या पुनर्जीवित होणे ही काळाची गरज असल्याचे मत उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र शासन व लोकसहभागातून सुरू झालेल्या 'चला जाणुया नदी'ला या अभियानातंर्गत दर्यापूर येथे आयोजित आढावा बैठकीचे अध्यक्ष म्हणून लोणारकर बोलत होते.

या अभियानांतर्गत अमरावती जिल्ह्यातील 3 नद्यांची निवड राज्य शासनाने केली आहे. त्यामध्ये चिखलदरा येथे उगम झालेली व पुढे अचलपूर, अंजनगाव व दर्यापूर या तालुक्यातुन वाहत अकाेला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील सांगवा (मेळ) येथे तापी खोऱ्यातील पुर्णा नदीस जावून मिळणाऱ्या चंद्रभागा नदीचा समावेश आहे.

नद्या, नाले, ओढ्यांचे पुनर्जीवन

जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा बैठकीत चंद्रभागा नदीचे नोडल अधिकारी म्हणून एसडीओ मनोज लोणारकर व अचलपूरचे एसडीओ संदीप अपार यांची निवड करण्यात आली आहे. चंद्रभागा व तिच्या उपनद्या, नाल्या, ओढ्यांचे पुनर्जीवन म्हणजे केवळ त्यांचे खोलीकरण वा स्वच्छता नव्हे. तर या नद्या अस्वच्छ, प्रदूषित होण्यामागील कारणांचा शोध घेणे. ती कारणे समाज व प्रशासकीय यंत्रणांनी हातात हात घेवून दुर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन चंद्रभागा नदीचे समन्वयक व श्रमराज्यचे अध्यक्ष अरविंद नळकांडे यांनी या बैठकीला संबोधीत करतांना केले.

यांचा सहभाग

बैठकीला उपविभागीय जल संधारण अधिकारी वानखडे, मयुर कराळे, गट विकास अधिकारी बाळासाहेब रायबोले, विनोद खेडकर, सहाय्यक गट विकास अधिकारी सी. जे. ढवक, गट शिक्षणाधिकारी डाॅ. सुधीर डोंगरे, विरेंद्र तराळे, सुनील स्वर्गीय, ए. एस. वाघमारे, तालुका कृषी अधिकारी एस. पी. हुड, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र राहाटे आदींनी सहभाग नोंदविला.

नदी संवाद यात्रेचे आयोजन

या बैठकीनंतर अरविंद नळकांडे 12 जानेवारी रोजी चंद्रभागा नदी संवाद यात्रेच्या शुभारंभाची घोषणा केली. प्रथम टप्प्याच्या या संवाद यात्रेचा समारोप 23 जानेवारी रोजी होणार असल्याचे त्यांनी सांगीतले आहे.

बातम्या आणखी आहेत...