आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातेगाव ग्रामपंचायतमध्ये दंवडी न देता पदभरती:स्थानिक नागरिकांचा आरोप, कारवाईची मागणी

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातेगाव ग्रामपंचायतीमध्ये सफाई कामगार, अकाऊंटंट, शिपाई, प्लंबर आदी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीवर भरती करण्यात आली. परंतु त्यासाठी दिलेले निकष न पाळता उमेदवारांची निवड मनमानी पद्धतीने करण्यात आली, असा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

तक्रारदारांच्या मते अशी भरती करण्यापूर्वी सीईओंची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असून दवंडी देत गावकऱ्यांना माहित केल्याशिवाय तसे करता येत नाही. त्यामुळे ही भरती रद्द करुन ती नियमानुसार केली जावी, अशी मागणी पुढे आली आहे. शासन निर्णय परिपत्रक क्रमांक संकीर्ण 2022 प्र.क्र. 17/परा-3 नुसार जे निवडीचे निकष आहेत, त्याप्रमाणे कलम 61 व 61 (अ)(1)(2) नुसार पद भरती होणे अपेक्षित आहे. परंतु सातेगाव ग्रामपंचायतीने ही पद भरती परस्पर मासिक सभेत कुठलीही चर्चा न करता किंवा ठराव न घेता व दवंडी न देताच केली. त्यासाठी गावातील उमेदवारांकडून अर्जही मागविण्यात आले नाहीत.

26 नोव्हेंबेर या संविधान दिनी हे असंवैधानिक काम केले गेले. संबंधितांनी स्वतःचे नातवाईकांची नियुक्ती करत ही पदे भरली. तक्रारदारांच्या मते ग्रामपंचायतीच्या कामकाजात सुस्पष्टता दिसून येत नाही. ठराव मासिक सभा होऊनसुद्धा ठरावबुक मध्ये नोंद विलंबाने केली जाते. गावात करोडो रुपयांची विकास कामे ग्रामपंचयतीमार्फत होत असताना प्रत्येक कामाचा खर्च, त्याची लांबी-रुंदी, कामासाठी लागणार कालावधी नमूद करणारे फलक लावले जात नाही. ग्रामपंचयतीचे सचिव गावातील नागरिकांची दिशाभूल करत असल्याचेही सदर तक्रारीत म्हटले आहे. सातेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य व तालुका शिवसेना प्रमुख कपिल देशमुख यांनी ही तक्रार केली असून संबंधित अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करवून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान या प्रकरणात ग्राम विस्तार अधिकारी अजय झाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की कोणत्याही प्रकारचे सध्या आम्ही पदे भरले नाहीत. वरिष्ठांच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर नियमानुसा ती पदे भरण्यात येतील.

बातम्या आणखी आहेत...