आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे येथील विभागीय क्रीडा संकुलात तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्राथमिक क्रीडा महोत्सव गुरूवारी (दि. २) यशस्वीरित्या पार पडला. यात यशवंत ठरलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचा पारितोषिक देवून गुणगौरव करण्यात आला.
दरम्यान सहभागी खेळाडू विद्यार्थ्यांना पारितोषिकासह खाऊ म्हणून जिव्हाळ्याची शिदोरी देवून निरोप देण्यात आला. या स्पर्धेत प्राथमिक, माध्यमिक विभागातील चॅम्पियनसह जनरल चॅम्पियन धारणी पंचायत समितीने पटकाविले. त्यामुळे धारणी पंचायत समिती चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ठरली.
यांची उपस्थिती
क्रीडा महोत्सवाचे पारितोषिक वितरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे यांच्या अध्यक्षतेखाली मंचावर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी. आर. खरात, प्राथमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, बुध्दभुषण सोनोने, मनपाचे शिक्षणाधिकारी राजीक, जिल्हा परिषद सायन्सस्कोर शाळेचे प्राचार्य गंगाधर मोहाने, क्रीडा महोत्सवाचे क्रीडा संयोजक डॉ. नितीन उंडे, गटशिक्षणाधिकारी डॉ. शीला लोखंडे, अरुण शेगोकर, धनंजय वानखडे, वकार खान, राजेश घवळे, मुरलीधर राजनेकर, दीपक कोकतरे, संगीता सोनोने आदी उपस्थित होते.
या प्रसंगी मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. प्राथमिक,माध्यमिक विभागाची जनरल चॅम्पीयनशिप धारणी पं.स.ला, तर सांस्कृतिक विभागात मोर्शी विजेता, तर अमरावती उपविजयेता ठरले. या सोहळ्याचे प्रास्तविक डॉ. नितीन उंडे यांनी केले. सूत्रसंचालन गजानन देशमुख, तर आभार उपशिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी मानले असल्याची माहिती क्रीडा महोत्सव कार्यक्रम प्रसिद्धी समिती प्रमुख राजेश सावरकर, शकील अहमद व राजेंद्र दीक्षित यांनी दिली.
खाऊ म्हणून ‘जिव्हाळ्याची शिदोरी’
जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवात सहभागी खेळाडू विद्यार्थ्यांना पारितोषिकासह खाऊ म्हणून जिव्हाळ्याची शिदोरी देवून निरोप देण्यात आला. या शिदोरीत आठ प्रकारच्या वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचा समावेश होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.