आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुसाईड:दर्यापुरात नवविवाहितेची आत्महत्या, छताच्या फॅनला साडीद्वारे घेतला गळफास

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दर्यापूर शहरातील वाल्मिकी नगर (बारा खोल्या ) येथील एका २५ वर्षीय नवविवाहितेने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्र दिनी सायंकाळी साडेपाच वाजता उघडकीस आली. या घटनेने माहेर व सासरकडील कुंटूबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सीमा राहुल दुर्गे (गाडे) वय २५ वर्ष असे मृत विवाहितेचे नाव आहे.

नक्की घटना काय?

दोन महिन्यांपूर्वीच राहुल दुर्गे या तरुणाशी सीमा हिचे लग्न झाले होते. पती राहुल पुणे येथे एका खाजगी कंपनीमध्ये काम करतात. घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास सीमाने घरातील खोल्यांचे दरवाजे आतून बंद करुन छताच्या फॅनला साडीच्या मदतीने गळफास लावून आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.

घटना उघडकीस आल्यानंतर लगेच सीमा यांना स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान आज, मंगळवारी दुपारी शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव माहेरकडील मंडळीच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर अंत्यविधीसाठीची क्रिया पार पडली. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार संतोष ताले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.