आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाचा चटका वाढला:शहरात पारा 42.9 अंश सेल्सियसवर‎, उकाड्याने नागरिक कासावीस

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील तीन‎ दिवसांपासून शहरात सूर्य आग‎ ओकायला लागला आहे. गुरुवारी‎ (दि. ११) शहरातील पारा तब्बल‎ ४३.९ अंश असल्याची नोंद जल‎ विज्ञान प्रकल्पाने केली आहे.‎

यंदाच्या उन्हाळ्यातील ही सर्वोच्च‎ तापमानाची नोंद आहे. एप्रिल‎ महिन्यात अवकाळी पावसाचे सावट‎ होते, त्यामुळे संपूर्ण महिनाभर‎ तापमान ४० अंशाच्या आसपासच‎ होते. दरवर्षी मात्र एप्रिलमध्ये शहरात‎ तापमानाचा पारा ४४ अंशांपर्यंत‎ पोहोचतो.

यंदा मात्र अजूनही पारा‎ ४४ अंशावर गेला नाही पण मागील‎ दोन ते तीन दिवसांपासून तापमानात‎ दरदिवशी वाढ होत आहे. गुरुवारी‎ दुपारी शरीराची लाही लाही करणारे‎ ऊन शहरात होते.‎