आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Amravati Umesh Kolhe Murder Case Update | Nupur Sharma And Umesh Kolhe Amravati | Another CCTV Video Of The Incident Came To Light; Umesh Kolhe Was Stabbed By The Accused

अमरावती हत्याकांड:घटनेचा आणखी एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर; उमेश कोल्हेंना आरोपींनी चाकूने भोसकले

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
या व्हिडिओला 'दिव्य मराठी' दुजोरा देत नाही

अमरावती येथील मेडिकल व्यवसायिक उमेश कोल्हे यांच्यावर झालेल्या हल्ल्याशी संबंधित एक नवीन सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ 21 जूनच्या रात्री 10 वाजेदरम्यानचा आहे. मात्र, या व्हिडिओला 'दिव्य मराठी' दुजोरा देत नाही. यामध्ये आरोपी उमेशला थांबवून त्याच्यावर चाकूने हल्ला करताना दिसत आहेत. अमरावती पोलिसांनी हा व्हिडिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी कलिना लॅबकडे पाठवला आहे.

कोल्हेंवरील हल्ल्याचा हा व्हिडीओ एका शाळेतील सीसीटीव्हीत कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या व्हिडीओत रात्र असल्याने आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत नाही. सीसीटीव्हीत उमेश कोल्हे यांच्यावर दोन जण हल्ला करत असल्याचे दिसत आहे. तर दुसरा व्यक्ती गाडी वळवत आहे. कोल्हेवर हल्ला केल्यानंतर हे तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे. अमरावती पोलिसांनी हल्लात समावेश असलेल्या दोघांसह आणखी 7 जणांना ताब्यात घेतले आहे. सर्वांना 8 जुलै पर्यंत एनआयएची कोठडी सुनावण्यात आली आहे.

उमेशच्या मेडिकल दुकानापासून हा हल्ला 100 मीटर अंतरावर झाला आहे. व्हिडीओ झूम केल्यावर एक व्यक्ती गुडघ्यांवर बसलेला दिसत आहे. त्यावर आरोपी हल्ला करत आहे. या व्हिडिओत गुडघ्यांवर बसलेला व्यक्ती उमेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

सात जणांना अटक

इरफान शेख रहीम याने कोल्हे यांच्यावर हल्ला करण्यासाठी दोन जण भाड्याने घेतले होते. दोघे आरोपी हे ऑटोचालक असल्याचे कळते. तर इतर सात जण हे मजूर असल्याचेही तपासात समोर आले आहे. इरफानने प्रथम त्यांना आपल्या एनजीओमध्ये बोलावून त्यांचे ब्रेनवॉश केले, त्यानंतर आरोपींनी त्यांना पैशाचे आमिष दाखवून या हत्याकांडात सामिल केले. या खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एक एनजीओ ऑपरेटर, एक पशुवैद्यकीय डॉक्टर, दोन ऑटोचालक आणि चार मजुरांना अटक केली आहे. मुख्य आरोपी इरफान शेख रहीम हा अमरावतीच्या कमला ग्राउंड परिसरात राहणारा आहे. रायबर हेल्पलाइन नावाची एनजीओ चालवते, असे तपासात समोर आले आहे. त्यात एकूण 21 सदस्य होते आणि सर्व अमरावतीचे रहिवासी आहेत.

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय?

उमेश कोल्हे यांची 21 जून रोजी अमरावतीतील घंटाघर येथील श्याम चौक परिसरात हत्या करण्यात आली होती. उमेश कोल्हे यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्यांच्या गळ्यावर 5 इंच रुंद, 7 इंच लांब आणि 5 इंच खोल जखमा आढळून आल्या आहेत. चाकूने मेंदूला इजा झाल्याचे अहवालात समोर आले आहे. यासोबतच श्वासोच्छवासाची नलिका, अन्न नलिका आणि डोळ्यांच्या शिरादेखील खराब झाल्या आहेत. पोलिसांनी आतापर्यंत इरफान खान, मुदस्सर अहमद, शाहरुख पठाण, अब्दुल तौफिक, शोएब खान, अतीब रशीद आणि युसूफ खान या 7 आरोपींना अटक केली आहे. त्याचवेळी, 8 वा आरोपी शमीम अद्याप फरार असून, त्याने न्यायालयाकडे अटकपूर्व जामीन मागितला आहे.

शिरच्छेद करण्याच्या धमक्या

दिव्य मराठीच्या तपासात उदयपूर येथील टेलर कन्हैयालाल आणि अमरावती येथील केमिस्ट उमेश कोल्हे यांची तालिबानी पद्धतीने गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे समोर आले. तसेच अमरावतीमध्ये नुपूर शर्माच्या समर्थनार्थ स्टेटस आणि पोस्ट लिहिल्याबद्दल आणखी 8 जणांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. यामध्ये एक डॉक्टर, दोन केमिस्ट, एक सरकारी कर्मचारी, एक मोबाईल शॉपी मालक आणि इतर काही जणांचा समावेश आहे. अमरावतीच नाही तर नागपूर आणि अकोल्यातही नुपूर शर्माला पाठिंबा दिल्याने ‘शिरच्छेदन’ करण्याची धमकी देण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...