आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा प्रस्तावित संप टळला:सरकारी स्तरावर घडामोडींना वेग, आठवडाभर प्रतीक्षेची संघटनेची भूमिका

अमरावती16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासोबतच फरकाची रक्कम आणि परदेशी विद्यापीठांना बंदी,यासारख्या विविध मागण्यांसाठी विद्यापीठ कर्मचारी महासंघाने संपाची हाक दिली होती. परंतू, मागण्या मान्य करण्यासाठी राज्य शासनाच्या पातळीवर सुरु असलेल्या वेगवान घडामोडी तसेच शासनातर्फे किमान आठवडाभराची मुदत द्या, असे करण्यात आलेले आवाहन यामुळे आज, शनिवार, 11 मार्चपासून सुरु होणारा संप तूर्त मागे घेण्यात आला आहे.

दरम्यान संप मागे घेण्यात आल्याने विद्यापीठाच्या कामकाजावर ओढवलेले संभाव्य संकटही टळले आहे. संप मागे घेण्यात आल्याने आगामी 14 मार्च रोजी होणारी अधीसभेची (सिनेट) पहिली बैठक विनासायास होणार असून इतर विभागांचे कामकाजही सुरळीत सुरु राहणार आहे. विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे प्रदेश पदाधिकारी तथा जिल्हाध्यक्ष अजय देशमुख यांच्यामते कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आठवडाभराची प्रतीक्षा केली जाईल. त्यानंतरही स्थिती बदलली नाही, तर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी गेल्या महिन्यात 20, 21 तारखेला बेमुदत संप करण्यात आला होता. दरम्यान 22 फेब्रुवारीला राज्य शासनाने संघटनेसोबत केलेल्या समाधानकारक वाटाघाटीअंती तो मागे घेण्यात आला. त्यानुसार 20 दिवसात आदेश लागू केला जाणार होता. परंतू, तो अद्याप झाला नाही. त्यामुळेच आजपासून पुन्हा संप सुरु केला जाणार होता. मात्र गेल्या दोन दिवसांतील घडामोडींमुळे तो तूर्त टळला आहे.

काय आहेत मागण्या?

  • सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जिवित करून जुनी पेन्शन योजना लागू करा
  • सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार दहा:वीस:तीस वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय तसेच माहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचा­ऱ्यांना लागू करा
  • सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या 1410 विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा
  • महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचा­ऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या फरकाची थकबाकी अदा करा, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचा­ऱ्यांची रिक्त पदे भरण्यास मान्यता द्या
  • 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचा­यांना जुनी पेंशन योजना लागू करा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन घोषित करण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...