आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमरावती:14 वर्षीय मुलीला 500 रुपयांच्या शर्यतीसाठी म्हटले ‘आय लव्ह यू’; टवाळखोरांचा प्रताप

अमरावती15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकाला पकडले, एक मुलगा अल्पवयीन

गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आशियाड कॉलनी भागातून मैत्रिणींसोबत पायी जाणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीला रस्त्यात थांबवून सतरा वर्षीय टवाळखोराने ‘आय लव्ह यू’ म्हटले. या प्रकाराने मुलगी घाबरली व पुढे गेली. त्यावेळी आय लव्ह यू म्हणणाऱ्या मुलाने त्याच्या मित्राला म्हटले की, मी आय लव्ह यू म्हटले, शर्यत जिंकली, आता दे पाचशे रुपये. या प्रकरणी मुलीने गाडगेनगर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन एकाला पकडले असून, दुसरा अल्पवयीन आहे. हा धक्कादायक प्रकार २१ एप्रिलला रात्री आठ वाजेच्या सुमारास घडला आहे. आशियाड कॉलनी परिसरातील मंदिरातून एक मुलगी तिच्या मैत्रीणींसोबत घराकडे पायी जात होती. त्यावेळी रस्त्यात तीन मुले एकत्रितपणे उभे होते.

ही मुलगी त्या टवाळखोरांजवळून जात होती, त्यावेळी सतरा वर्षे वय असलेल्या एका टवाळखोराने त्याचा हात आडवा करुन मुलीला अडवले आणि तिला ‘आय लव्ह यू’ म्हटले. या धक्कादायक प्रकाराने ही मुलगी चांगलीच घाबरली आणि पुढे निघून गेली. त्यावेळी या टवाळखोराने त्याच्यासोबत असलेल्या मित्रांना म्हटले की, मी आयलव्हयू म्हटले आहे. मी शर्यत जिंकलो असून, मला ५०० रुपये दे. हे टवाळखोर नेहमीच परिसरात उभे राहतात. ते नेहमीच चिडीमारी करत असल्याचे अल्पवयीन मुलीने पोलिस तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणी पीडीत मुलीने घडलेला प्रकार घरी सांगितला. तसेच पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तीन टवाळखोरांविरुद्ध विनयभंग तसेच पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून, आय लव्ह यू म्हणणारा अल्पवयीन आहे तर तिसऱ्याचा शोध सुरू असल्याचे गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...