आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खबरदारी:अमरावतीमध्ये वाढता तणाव पाहता संचराबंदी लागू, तीन दिवस इंटरनेट सेवा देखील राहणार बंद

अमरावती15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्रिपुरात घडलेल्या अत्याचाराच्या प्रकारानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्याचे दिसले. शुक्रवारी राज्यातील विविध भागांमध्ये निषेध मोर्चे काढण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी अमरावती बंदची हाक देण्यात आली होती. अमरावती शहर बंदला हिंसक वळण लागल्यानंतर शनिवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली. अमरावतीच्या अचलपूर, परतवाडा, कांडली परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याविषयी अचलपूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडून पत्रक जारी करण्यात आलेय. भाजप महिला जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी अमरावती ग्रामीण बंदचे आवाहन देखील केले होते.

यासोबतच यांनंतर पुढचे तीन दिवस इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली असल्याची माहिती आहे. शहर पोलिस आयुक्त आरती सिंह यांनी याविषयीची माहिती दिली. अमरावती येथे 5 हुन अधिक जमाव घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलन चिघळू नये, यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच या संदर्भात सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.

आतापर्यंत 20 जणांना अटक
त्रिपुरा दंगलीचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. राज्यातील अमरावतीत या पार्श्वभूमीवर जास्त हिंसक वातावरण झालेले दिसले. शुक्रवारपासून अमरावती शहरात तणाव आणि दशहतीचे वातावरण झाले होते. शनिवारी अमरावतीतील राजकमल चौकातही मोठ्या संख्येने जमाव एकवटला आणि दुकानांची तोडफोड केली. शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन पोलिस आणि पालकमंत्र्यांनी केलेले असूनही जमावाकडून हिंसक घटना घडत आहे. अमरावतीमध्ये शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी 20 एफआयआर नोंदवले आहेत, तर 20 जणांना अटक करण्यात आली आहे. अमरावती वगळता संपूर्ण राज्यात शांतता असल्याचे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. आम्ही स्थानिक लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. कोणी चिथावणी दिल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...