आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Amravati Weather Update|Meteorological Department Temperature Alert| Weather Updateशहरासह जिल्ह्यात 7 ते 9‎ तारखेपर्यंत राहणार उघडीप‎, कमाल तापमान २ अंशाने वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज‎

हवामान:शहरासह जिल्ह्यात 7 ते 9‎ तारखेपर्यंत राहणार उघडीप‎, कमाल तापमान २ अंशाने वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज‎

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती‎ सध्या हवामानाची लहरी स्थिती बघता ७ ते ९ मे‎ या कालावधीत जिल्ह्यात उघाड राहणार‎ असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.‎ कारण एप्रिल महिना हा बहुतांश ढगाळ‎ वातावरण, वादळी पाऊस यातच गेला. त्यामुळे‎ हा उन्हाळा की पावसाळा असे वाटल्यावाचून‎ राहिले नाही. ७ ते ९ या कालावधीत कमाल‎ तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने वाढण्याची‎ शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.‎

काय असेल तापमान?

भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान‎ केंद्र, नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित‎ अंदाजानुसार, अमरावती जिल्ह्यात पुढील पाच‎ दिवस कमाल तापमान ३२.७ ते ३७.६; अंश‎ सेल्सिअस, तर किमान तापमान २१.२ ते २३.८‎ अंश सेल्सियसच्या दरम्यान राहील.

सकाळची‎ सापेक्ष आद्रता २९ ते ६१; टक्के तर दुपारची‎ सापेक्ष आद्रता १८ ते ४६ टक्के दरम्यान राहील.‎ वाऱ्याचा वेग सरासरी ताशी ६ कि.मी तास‎ राहील. ५ ते ९ दरम्यान आकाश अंशतः ढगाळ ते‎ ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवली.‎

हलक्या सरींची शक्यता

५ व ६ मे रोजी जिल्ह्यात तुरळक एक ते दोन‎ ठिकाणी खूप हलका ते हलका पाऊस‎ पडण्याची शक्यता आहे. एक ते दोन ठिकाणी‎ विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना‎ होण्याचीही शक्यता आहे. तसेच आकाश‎ ढगाळ राहील. त्यानंतर ७ ते ९ दरम्यान आकाश‎ स्वच्छ व निरभ्र राहण्याची शक्यता जिल्हा कृषी‎ हवामान केंद्र तथा कृषी विज्ञान केंद्र, दुर्गा पूर‎ बडनेराचे कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. सचिन मुंढे‎ यांनी वर्तवली आहे.‎