आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराठाणे जिल्ह्यातील पालघर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय महिला आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी अमरावती जिल्हा महिला संघ पात्र ठरला असून या स्पर्धेत खेळणाऱ्या महिला संघाची नुकतीच निवड चाचणी घेण्यात झाली. याद्वारे उत्तम खेळाडूंना संघात स्थान दिले आहे.
लक्ष्य आणि जिद्दीच्या बळावर अमरावतीकर महिला फुटबाॅलपटूंनी हे यश मिळवले आहे. फुटबॉल या खेळात फारच कमी वेळा महिला संघाला राज्यस्तरापर्यंत मजल मारता आली आहे. हरहुन्नरी प्रशिक्षक व संघटनेचे पदाधिकारी दिनेश म्हाला, स्वत: उत्तम राष्ट्रीय खेळाडू व सध्या संघ प्रशिक्षक असलेल्या अभिनव म्हालाने महिला संघाला आक्रमक खेळाचे धडे दिल्यामुळे या संघातही उत्तम कामगिरी करण्याचे कौशल्य निर्माण झाले आहे.
निवड चाचणीच्या आधारे राधिका मेहरा, कोमल ढोले, मुक्ता कावडे, आरती संगते, पूनम गावंडे, साक्षी कवसार, शिवानी कोपुल, दीक्षा मानके, मोनिका कडू, मेरी नायडू, वैष्णवी वासनिक, गौरी भलावी, आचल देवडेकर, तृप्ती यावले, पायल चंदेल, प्राची हिवसे, अनिता कोपुल यांची जिल्हा संघात निवड करण्यात आली आहे. विशेष बाब अशी की, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडे नोंदणी असलेल्या महिला खेळाडूंची या संघात निवड करण्यात आली. हा संघ येत्या १ ते ७ ऑगस्ट दरम्यान पालघर येथील राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणार असून संघाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून हरिहरनाथ मिश्रा, प्रशिक्षक अभिनव म्हाला राहतील.
राज्य फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झालेल्या संघाचे अमरावती जिल्हा अमेच्युअर फुटबॉल असोसिएशन सचिव सुशील सुर्वे, सहसचिव बाळासाहेब सोलिव व दिनेश म्हाला, क्रीडा मार्गदर्शक हरीहर मिश्रा, सदस्य प्रलय वाघमारे, विनोद मिश्रा, विनोद पंच्छेल, राजेश गुरूले,प्रवीण डाके, नयन वानखेडे, भारत भस्मे, अचलपूर तालुका फुटबॉल असोसिएशनचे सचिव डॉ. तुषार देशमुख, प्रवीण मोहोड यांनी अभिनंदन केले असून यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
संघातील सर्वच स्थानांसाठी अचूक खेळाडू निवडले
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अमरावती जिल्हा संघात उत्तम महिला खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. महिला फुटबॉलपटूंची निवड चाचणी घेण्यात आली. यात संघातील सर्वच स्थानांसाठी अचूक खेळाडू निवडण्यात आल्या.
- दिनेश म्हाला, सहसचिव, जिल्हा हौशी फुटबॉल संघटना.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.