आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडताळणी होणार:बदलीसाठी आजारपणाचा बनाव करणाऱ्यांची‎ संख्या वाढली; जिल्हा परिषद प्रशासन कठोर‎, 422 शिक्षकांवर प्रशासनाची टाच

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती‎ बदलीसाठी आजारपणाचा बनाव करणाऱ्यांची संख्या वाढीस लागल्याने जिल्हा परिषद‎ प्रशासन कठोर झाले असून तब्बल ४२२ ‎शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी ‎ ‎ करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी हे आदेश जारी केले‎ असून त्यासाठी १५ मेपर्यंतची मुदत देण्यात‎ आली आहे.‎

सध्या जिल्हा परिषदेत बदल्यांचे वारे वाहत‎ आहेत. वेगवेगळ्या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या‎ बदल्या केल्या जात आहेत. या क्रमात‎ शिक्षकांच्याही बदल्यांचे वेळापत्रक फार पूर्वीच‎ घोषित झाले असून, त्यानुसार अनेकांनी‎ ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत.

कठोर निर्णय

बदल्यांमध्ये‎ अंध-अपंग-आजारी संवर्गाला प्राधान्य‎ असल्याने बहुतांश शिक्षकांनी या संवर्गाचा‎ आधार घेतला आहे. परंतु आश्चर्याची बाब‎ अशी की, यामधील बहुतांश दस्तऐवज बनावट‎ असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच सीईओ‎ अविश्यांत पंडा यांनी हा कठोर निर्णय घेतला‎ असून बदलीसाठी आजारपणाचे प्रमाणपत्र‎ जोडणाऱ्यांना त्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी‎ करुन आणण्याचे संदेश पाठवले आहे.‎

आता होणार वैद्यकीय पडताळणी‎

अमरावती विभागासाठी यवतमाळ येथील‎ शासकीय रुग्णालयात वैद्यकीय मंडळ आहे. या‎ मंडळात सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर्स असल्याने‎ त्यांच्या माध्यमातून केली जाणारी पडताळणी‎ ही अंतीम व खरी चाचणी समजली जाते.‎ त्यामुळे स्वत: अथवा कुटुंबीयांच्या‎ आजारपणाची सबब पुढे करुन बदली‎ मागितलेल्या शिक्षकांनी त्यांनी सादर केलेल्या‎ वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी करुन‎ आणावी, असे सीईओंचे आदेश आहेत. या‎ आदेशानुसार शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख‎ यांनी बदली मागणाऱ्या संबंधित शिक्षकांना तशी‎ पत्रे धाडली असून वैद्यकीय मंडळाकडून‎ प्रमाणपत्रे पडताळून घ्यावीत, अशी सूचना‎ केली आहे.

प्रमाणपत्रे पडताळा

त्यासाठी आगामी १५ मेपर्यंतची‎ मुदत देण्यात आली असून या कालावधीत‎ किती जण तशी प्रमाणपत्रे सादर करतात,‎ यावरुन खरे-खोटे कारण सांगणाऱ्यांची‎ संख्याही स्पष्ट होणार आहे. आजारपणाचे‎ प्रमाणपत्र जोडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक १८२ ही‎ संख्या अस्थिव्यंगाची आहेत. त्याखालोखाल‎ ८६ ही संख्या हृदयरुग्णांची आहे. त्यापैकी ५८‎ जणांना येत्या काळात हृदय शल्यक्रिया करावी‎ लागणार असून २८ शिक्षकांची हृदय शल्यक्रिया‎ झाली आहे.

३१ शिक्षक हे मेंदूशी संबंधित‎ आजाराने ग्रस्त आहेत तर १८ शिक्षकांना‎ कर्करोगाने ग्रासले असून १३ शिक्षकांना‎ पक्षाघात झाला आहे. ८ जणांना किडनीचा त्रास‎ असून एक शिक्षक थॅलेसेमियाग्रस्त आहे. या‎ सर्व शिक्षकांना त्यांनी सादर केलेली प्रमाणपत्रे‎ पडताळून आणण्याचे आदेश दिले आहेत.‎

तरतूदींच्या अनुषंगाने बदलीची मागणी

७६० शिक्षक ५३ वर्षांवरील‎ नियमानुसार ५३ वर्षांहून अधिक वय असलेल्यांनाही बदलीसाठी प्राधान्य मिळते. अशा‎ शिक्षकांची संख्या ७६० आहे. तर विधवा असलेल्या शिक्षिकांची संख्या १०२ असून‎ बदलीसाठी त्यांनीही ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. सैन्य दलातील निवृत्तांचे‎ नातेवाईक या संवर्गातील १३ शिक्षकांनीही त्यांना लागू असलेल्या तरतुदींच्या अनुषंगाने‎ बदलीची मागणी केली आहे.‎