आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेत लिपिकांना पदोन्नती:7 वरिष्ठ सहायक बनले कनिष्ठ प्रशासन अधिकारी, 12 जणांची वरिष्ठ सहायक पदी नियुक्ती

अमरावती6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पदोन्नतीची प्रक्रिया राबवल्याबद्दल सीइओ अ‌विश्यांत पंडा यांचे स्वागत करताना जि.प. कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते. - Divya Marathi
पदोन्नतीची प्रक्रिया राबवल्याबद्दल सीइओ अ‌विश्यांत पंडा यांचे स्वागत करताना जि.प. कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते.

जिल्हा परिषदेतील लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. 7 वरिष्ठ सहायकांना कनिष्ठ प्रशासन अधिकारीपदी बढती देण्यात आली असून 12 जणांना वरिष्ठ सहायक पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

दरम्यान, बढतीची प्रक्रिया त्वरेने राबवून कर्मचाऱ्यांना न्याय दिल्याबद्दल जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने सीईओ अविश्यांत पंडा व उपमुख्य कार्यपालन अधिकारी तुकाराम टेकाळे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. कर्मचाऱ्यांनी सीईओंना पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता व्यक्त केली.

या कर्मचाऱ्यांची पदोन्नती

नवनियुक्त कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांमध्ये संदीप कोवे, ज्योती गावंडे, विद्या पेठे, लिलाधर नांदे, संजय येऊतकर, सुजीत पेटे व सुनीता काकडे या सात जणांचा समावेश आहे. तर कनिष्ट लिपिकांमधून वरिष्ठ सहायकपदी बढती मिळालेल्यांमध्ये राहुल शहाळे, एम. ए. आंडे, पी. बी. सलुजा, शिला मालधुरे, सागर मेश्राम, सारंग नारिंगे, मंगेश बुरंगे, किरण खांडेकर, नितीन अढाऊ, निलेश दहातोंडे, डी. एन. काष्टे आणि परिक्षीत बारहाते यांचा समावेश आहे.

अखेर मागणी पूर्ण झाली

पदोन्नतीसाठी आवश्यक असलेली अर्हता परीक्षा घेतली जावी म्हणून या कर्मचाऱ्यांनी गेले अनेक दिवस प्रशासनाकडे पाठपुरावा केला. विभागीय आयुक्तांनाही भेटून त्यांनी आपला मुद्दा रेटला होता. अखेर दरम्यानच्या काळात परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे पदोन्नतीचा मार्ग खुला झाला होता. त्यामुळे आज जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष पंकज गुल्हाने, युनियनचे पदाधिकारी तथा जि.प. शिक्षक सहकारी बँकेचे संचालक विजय कोठाळे आदींनी सीईओंचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...