आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश:‘एमपीएससी’त अमरावतीचा निपुण मनोहर राज्यात 85 वा; एससी प्रवर्गातून राज्यात तिसरा येण्याचा मान

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ‘राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२०’चा अंतिम निकाल ३१ मे रोजी जाहीर झाला असून यामध्ये अमरावतीचा निपुण मनोहर हा राज्यात ८५ वा तर अनुसूचित जाती प्रवर्गातून तिसरा आला आहे. निपुणने तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले. त्याची सहाय्यक राज्यकर आयुक्तपदी निवड झाली आहे. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

शहरातील चपराशीपुरा येथील रहिवासी निपुण मनोहरने कॅम्पुटर इंजिनिअर आहे. निपुणच्या घरची परिस्थिती ही मध्यमवर्गीय असून आई मंदा मनोहर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षक सहकारी सोसायटीमध्ये वरिष्ठ सहायक लिपिक पदावर कार्यरत आहेत. तर वडील गौतम मनोहर सहकारी संस्थेच्या ऑडिटचे कामे करतात. निपुण हा लहानपणापासूनच शिक्षणात हुशार होता. परंतु भविष्यात अधिकारी होईल असे स्वप्न निपुणने केव्हाच पाहिले नाही.

परंतु २०१६ मध्ये त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. निपुणच्या काही मित्रांना एमपीएससी परीक्षेत यश मिळाले. हे यश पाहून निपुणने ही २०१७ पासून एमपीएससीची तयारी करायला सुरवात केली. २०१८ मध्ये निपुणने पहिल्यांदाच एमपीएससी दिली. परंतु, यात पूर्व परीक्षाही तो पास झाला नाही. यानंतर २०१९ च्या परीक्षेत निपुन हा मुख्य परीक्षा तसेच मुलाखतीपर्यंत पोहचला, मात्र, त्याला यश आले नाही. त्यामुळे २०२० ला पुन्हा एकदा निपुणने एमपीएससी परीक्षा दिली आणि या तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश आले. निपुणने या परीक्षेमध्ये राज्यातून ८५ वा तर एस्सी प्रवर्गातून तिसरा आला आहे. निपुण मनोहर हे एमपीएसीच्या मुलांना यूट्यूब चॅनल, टेलिग्रामच्या माध्यमातून विविध विषयांवर मार्गदर्शनही करतात.

बातम्या आणखी आहेत...