आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:अमरावतीची ‘ती’ तरुणी रागाने निघून गेली होती, बेपत्ता असण्यामागे ‘लव्ह जिहाद’ असल्याचा होता आरोप

अमरावती21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजापेठ ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक १९ वर्षीय तरुणी मंगळवारी ( ६ सप्टेंबर) दुपारपासून बेपत्ता झाली होती. बुधवारी तरुणी बेपत्ता असण्यामागे ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा व भाजपच्या वतीने करण्यात आला होता. खासदार राणा यांनी पोलिस ठाण्यात गोंधळदेखील घातला हाेता. दरम्यान, ती तरुणी बुधवारी रात्री साताऱ्यात सापडली आहे. रागारागात आपणच घरून निघून आल्याचे या तरुणीने सातारा पोलिसांना सांगितले असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी गुरुवारी ( ८ सप्टेंबर) दिली आहे.

दरम्यान मंगळवारी दुपारी घरून निघाल्यानंतर बडनेरा रेल्वेस्थानकावर ती पोहोचली. बडनेरावरून भुसावळ आणि तेथून तिने पुणे गाठले. पुण्यावरून तिला अमरावती पुन्हा परत यायचे होते. तिने स्टेशनवर येणाऱ्या-जाणाऱ्यांना विचारपूस केली असता, तेव्हा त्या ठिकाणी कोणीतरी तरुणीला सांगितले की, साताऱ्यावरूनही अमरावतीत जाण्यासाठी रेल्वे आहे. त्यामुळे पुण्यावरून ती सातारा जाण्यासाठी रेल्वेत बसली. त्यानंतर सहा तासांच्या थरारक पाठलागानंतर रेल्वे पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले. संबंधित युवती तसेच संशयिताची विचारपूस केल्यानंतर याबाबतची अधिक माहिती मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...