आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुहेरी भूमिका:असिस्टंट कमांडंट अन् डॉक्टरही; एकीकडे नक्षलवादाशी, दुसरीकडे कोरोनाविरुद्धच्या लढाईत अमरावतीच्या शेलोटकरांची दुहेरी भूमिका

अमरावतीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • दिव्य मराठी विशेष : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर कार्यरत जवानाची आदिवासीबहुल भागात वैद्यकीय सेवेसोबत जनजागृतीही

अनुप गाडगे

कोरोनामुळे संपूर्ण जग, देश, राज्य, राज्यातील प्रत्येक गाव, शहर दहशतीत आले आहे. त्यामुळे संपूर्ण शासकिय यंत्रणा कोरोनाच्या मुकाबल्यासाठी “योद्धा’ बनली आहेत.  महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात आदिवासी बहूल गावांमध्येही कोरोनाबाबत जनजागृती व्हावी, या अतिदुर्गम भागातील जनतेलाही काेरोनापासून दूर राहता यावे म्हणून इतर शासकीय यंत्रणासोबतच पोलिस, सीआरपीएफचे जवान आपले मूळ काम सांभाळून प्रयत्नरत आहेत. यात सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून कार्यरत असलेले अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरूकुंज मोझरीचे डॉ. चेतन शेलोटकर सध्या दुहेरी भूमिका बजावूून कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. 

डॉ. शेलोटकर फिजिओथेरपीस्ट असून २०१३ मध्ये यूपीएससी-सीएपीएफ परीक्षा दिली. यात त्यांनी देशातून १६३ वा क्रमांक मिळवला. त्यांची सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडंट पदावर निवड झाली. २०१३ पासून सीआरपीएफमध्ये सेवा बजावताना त्यांनी झारखंड, कर्नाटक तसेच भारतीय सैन्यात कॅप्टन या पदावर जम्मू कश्मिरमध्ये सेवा केली आहे. दरम्यान तीन महिन्यांपूर्वीच डॉ. शेलोटकर यांची बदली गडचिराेली जिल्ह्यात झाली. सद्या ते छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर नक्षलग्रस्त भागात कार्यरत आहेत. 

कोरोनाबद्दल जनजागृती... 

गडचिरोलीत नक्षल्यांसोबत दोन हात करताना डॉक्टर म्हणून कर्तव्य ओळखून ते अतिदुर्गम भागातील आदिवासी बहूल गावांत कोरोनाबाबत जनजागृतीचे काम करत आहेत. जनजागृतीसोबतच सीआरपीएफच्या वतीने गावकऱ्यांना मास्क, निर्जुंतीकरणाचे द्रव्य व अन्य अत्यावश्यक बाबीसुद्धा देण्याचा प्रयत्न जवानांकडून सुरू आहे. आतापर्यँत सुमारे २० गावांमध्ये त्यांनी ही सेवा दिली आहे.

कोरोना काय, हेसुद्धा माहिती नाही!

एकीकडे संपूर्ण जग कोरोनामुळे धास्तावले आहे. मात्र नक्षलग्रस्त भागातील अतिदुर्गम गावातील अनेकांना अजूनही कोरोना काय हे माहिती नाही. डॉ. शेलोटकर या भागात कुणाला आजार असेल तर जवळची औषधी देणे, गावकऱ्यांपैकी कोणालाही काही वैद्यकिय अडचण भासली तर ती सोडवणे असे कार्य करत कोरोनाबद्दल जनजागृतीही करत आहेत. 

डॉक्टर असल्याचा फायदा

नक्षलवाद्यांचा सामना करण्यासोबतच अतिदुुर्गम भागातील गावकऱ्यांमध्ये कोरोनाबद्दल जनजागृती सुरू आहे. स्वत: डॉक्टर असल्याचा फायदा होत आहे. असिस्टंट कमांडट आणि डॉक्टर अशी दुहेरी भूमिका बजावताना आम्ही १८ ते २० गावांमध्ये जनजागृती केली आहे. - डॉ. चेतन शेलोटकर, असिस्टंट कमांडंट (सीआरपीएफ)

बातम्या आणखी आहेत...