आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश:कथ्थक नृत्य अलंकार परीक्षेत‎ अमरावतीच्या वैभवी बोडे प्रथम‎

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैभवी बोडे हिने अखिल भारतीय‎ गांधर्व महाविद्यालय मंडल, मुंबई यांच्याकडून‎ गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या‎ कथ्थक नृत्य अलंकार या परीक्षेत प्रथम श्रेणीत यश‎ प्राप्त केले असून अलंकार ही पदव्योत्तर पदवी तिने‎ प्राप्त केली. आपल्या कथ्थक नृत्याने वेगळी‎ ओळख निर्माण करणाऱ्या वैभवीच्या या यशाने‎ अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला‎ गेला आहे. यापुर्वी तिने विद्याभारती‎ महाविद्यालयातून बी. एस्सी. व नंतर एम. एच.‎ आर. डी.चे शिक्षण पूर्ण केले आहे. संत गाडगेबाबा‎ अमरावती विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन‎ सांस्कृतिक संघाचे राज्य व राष्ट्रीय स्तरावर‎ प्रतिनिधीत्व केले आहे. ती आपल्या यशाचे श्रेय‎ आजोबा दत्तराज बोडे, रमेश बोडे तसेच गुरू‎ राजेश बोडे व डॉ. महेंद्र बोडे यांना देते. वैभवीने‎ मिळविलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...