आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती जिल्ह्यातील दर्यापूर, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, भातकुली, चांदूर बाजारसह इतर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतल्या जाते. या वर्षी कापसाला चांगला भाव मिळणार म्हणून बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी न काढता दोन ते तीन महिन्यांपासून घरातच त्याची साठवणूक केली आहे.
चांगला भाव मिळाला की, कापूस विक्रीला काढू असे नियोजन केले. मात्र, शासनाने कापसाच्या दराबाबत कुठलीच योग्य ती घोषणा न केल्याने कापूस घरातच पडून असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. घरात ठेवलेल्या कापसामुळे अंगाला लाल चट्टे पडून शरीर खाजवत आहे. त्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांना मिळेल त्या भावाने कापूस विक्रीसाठी काढावा लागत आहे.
गतवर्षी कापसाच्या भावाने १२ हजार रुपयाचा टप्पा पार केला होता. त्यामुळे या वर्षी सुध्दा कापसाला योग्य दर मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र कापसाचे भाव वाढले नाही. भाव वाढीच्या प्रतिक्षेत घरात भरून ठेवलेला कापूस त्वचेवर दुष्परिणाम करत आहे. त्वचेवर लालसर ठिपके पडून खाज सुटली आहे.
कापसामुळे हाता पायावर पाठीवर, पोटावर मोठ्या प्रमाणात खाज येत आहे. अचलपूर तालुक्यात इसापूर, काकडा, हरम, टवलार, धामणगाव गढी येथील बहुतांश शेतकऱ्यांचा घरी कापूस पडून आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी कवडीमोल भावात कापूस विक्रीला प्राधान्य देत आहे, तर काही शेतकरी मात्र कापूस दरवाढीच्या प्रतिक्षेत असून कापसाच्या संपर्कात येणे टाळत आहे.
जागतिक स्तरावर मंदी
विदर्भातील शेतकऱ्यांनी दरवाढ होणार म्हणून कापसाची साठवण केली आहे. मात्र जागतिक स्तरावर मंदी असल्याने सध्या कापसाचे दर प्रती क्विंटल ७८०० ते ८००० रुपये आहेत.
- दुर्गाशंकर अग्रवाल, व्यापारी
बुरशीमुळे खाजेचा त्रास कापसावरील सरकीतील सूक्ष्म ॲस्परजिलस या बुरशीमुळे अंगाला खाज येणे, लालचट्टे पडणे, पुरळ येणे, फोड येणे ही लक्षणे दिसून येतात. त्यामुळे कापसापासून दूर रहावे. नाकाला कापड बांधावे, अंगाला मॉश्चराईज लावावे, थंड बर्फ लावावा, त्रास होत असेल डॉक्टरांशी संपर्क साधावा. -डॉ. राजश्री वाघ, त्वचारोग तज्ज्ञ, परतवाडा
चांगला भाव मिळेल म्हणून साठवला होता कापसाला चांगला भाव मिळावा म्हणून घरात कापूस साठवणूक करून ठेवला होता. मात्र काही दिवसांपासून कापसाच्या संपर्कात आल्याने अंगाला खाज सुट असल्यामुळे कापूस विकण्याचा निर्णय घेतला आहे. -शंकर ठाकरे, कापूस उत्पादक शेतकरी, इसापूर साठवून ठेवलेल्या कापसामुळे शेतकऱ्यांना खाजेचा सामना करावा लागत असून, त्यांच्या शरीरावर असे चट्टे पडताहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.