आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:आमझरी मधाचे गाव अधिकृत शिक्कामोर्तब; खादी ग्रामोद्योग मंडळाच्या सीईओ अंशु सिन्हा यांची माहिती

अमरावती10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिखलदरा तालुक्यातील आमझरी हे ‘मधाचे गाव’ म्हणून विकसित होण्यासाठी या योजनेची सर्व विभागांनी काटेकोर अंमलबजावणी करावी. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना कायमस्वरूपी रोजगार मिळेल, असा विश्वास राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंशु सिन्हा यांनी बुधवारी व्यक्त केला.

राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत आमझरी येथे मधाचे गाव संकल्पना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने अंशु सिन्हा यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली, तसेच विविध विभागाच्या अधिका-यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सावन कुमार, राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपीन जगताप ,जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांच्यासह तहसीलदार, गटविकास अधिकारी, सिपना महाविद्यालयातील मधुमक्षिका पालन विभागप्रमुख उपस्थित होते.

यावेळी सिन्हा म्हणाल्या की, मधाचे योग्य व शास्त्रीय पद्धतीने संकलन व त्यानुषंगाने उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. मधाचे गाव म्हणून विकसित होण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे.

बातम्या आणखी आहेत...