आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबडनेरातील मिलचाळ परिसरात राहणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाला एका महिलेसह तिघांनी मारहाण केली. मारहाण केल्यानंतर त्याला विहीरीत टाकले. यामध्ये त्या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृतकाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन चौघांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी गुरुवारी (दि. 16) गुन्हा दाखल झाला आहे. अनैतिक संबधातून हा खुन झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
विशाल महेश हीवराळे (18, रा. मिलचाळ, बडनेरा) असे मृतक तरुणाचे तर मेहराज उल्लाखान हिदायत उल्ला खान (28) याच्यासह एक 26 वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. अन्य दोन अनाेळखी आरोपींविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. विशालचे आरोपी असलेल्या 26 वर्षीय महिलेसोबत मागील वर्षभरापासून अनैतिक संबंध होते. त्यांच्या अनैतिक संबंधावरून मेहराज हा नेहमीच विशालला हटकत होता. त्या महिलेकडे तू यायचे नाही, असे नेहमीच मेहराज विशालला सांगत होता. तसेच दोन दिवसांपूर्वीच मेहराजने विशालला मारण्याची धमकी सुध्दा दिली होती. दरम्यान या महिलेसोबत अनैतिक संबध असल्याची बाब विशालने काही दिवसांपुर्वी त्याच्या आईला सांगितली होती.
संगनमत करुन विशालला मारहाण
त्यावेळी या महिलेकडे तू जाऊ नकोस, असे आईने विशालला समजावून सांगितले होते. तरीसुध्दा त्याचे तेथे जाणे-येणे सुरूच होते. दरम्यान बुधवारी (दि. 16) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास विशाल त्या महिलेच्या घरी गेला. त्यानंतर रात्री सव्वा अकरा ते साडेअकरा वाजताच्या दरम्यान मेहराज व त्याचे दोन अनोळखी मित्र तसेच ही 26 वर्षीय महिला या चौघांनी संगनमत करुन विशालला मारहाण केली व पाचबंगला परिसरातील एका विहिरीत फेकून दिले.
बडनेरा पोलिस ठाण्यात तक्रार
यातच त्याचा मृत्यू झाला. अशी तक्रार मृतक विशालचा भाऊ विष्णू महेश हिवराळे (21) याने बडनेरा पोलिस ठाण्यात दिली. त्या तक्रारीवरुन पोलिसांनी चौघांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहीती मिळताच बडनेराचे ठाणेदार बाबाराव अवचार, उपनिरीक्षक उमेश मारोडकर पथकासह घटनास्थळी पोहचले होते. दरम्यान गुरुवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला. बडनेरा पोलिस प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.