आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशा:शेंदुरजनाघाट येथे गणेशाच्या एका आरतीचा पोलिसांना दिला मान

शेंदुरजनाघाटएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या मोठा भाजी बाजार परिसरातील आनंद सांकृतिक गणेश मंडळाने या वर्षी श्री गणेशाच्या आरतीचा मान पोलिसांना दिला. इतर सार्वजनिक गणेश मंडळांनी सुद्धा एका आरतीचा मान पोलिस बांधवांना देवून त्यांनाही या उत्सवात सहभागी करून घेण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले.

प्रत्येक सण व उत्सव शांततेत पार पडावा म्हणून आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून पोलिस कर्तव्य बजावत असतात. त्यांनाही सण, उत्सवांचा लाभ घेता यावा, या उद्देशाने भाजी बाजार परिसरातील आनंद सांस्कृतीक गणेश मंडळाने कर्तव्यावर असलेले ठाणेदार प्रदीप चौगावकर यांना श्री गणेशाची आरती करण्याचा मान दिला. मंडळाच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

या मंडळाचे व्यवस्थापक तथा द पॉवर ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष दीपक खंडेलवाल, अनिल गुल्हाने, राजेश गुल्हाने, मनोज गुल्हाने, किशोर गुल्हाने, कमलाकर देशमुख, डॉ. संदीप बेहरे, शैलेंद्र खंडेलवाल, धीरज गुल्हाने, हरीश कानुगो, लोकेश गुल्हाने, हर्षल गुल्हाने, नितीन गुल्हाने, लोकश अग्रवाल, राजेंद्र खंडेलवाल, संजय कानुगो, अमोल गुर्जर, जितेंद्र देवघरे, अजय गुल्हाने, अशोक खेरडे, राम खंडेलवाल, राहुल गुल्हाने, राजेश खंडेलवाल, प्रवीण गुल्हाने, योगेश गुर्जर, राहुल लोखंडे, अभिषेक खंडेलवाल, सचिन गुल्हाने, शशांक गुर्जर, आलोक खंडेलवाल, अमित खंडेलवाल, तुषार मानकर, पुरुषोत्तम सुरजुसे, सागर श्रीराव, बिपिन गुल्हाने, भुषण नेरकर, रविकांत खंडेलवाल, राकेश खंडेलवाल, प्रमोद फुटाणे, गजानन शिरभाते, राहुल कानुगो, श्याम बिजवे, प्रदीप पटेल, भगवंत पोफळे आदी परिश्रम घेत आहेत.

दरम्यान, दोन वर्षाच्या कोरोना संकटानंतर यावर्षी निर्बंधमुक्त सण, उत्सव साजरे केले जात आहेत. गणेशोत्सव साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणे गरजेचे आहे. सण, उत्सवादरम्यान कुठल्याही प्रकारचा वाद न करता आपल्या गावची शांतता आपणच राखली पाहिजे, असे आवाहन ठाणेदार चौगावकर यांनी केले.

प्रत्येक गणेश मंडळाने घ्यावा पुढाकार
पोलिस अधिकारी व कर्मचारी वर्षभर सण, उत्सवांच्या काळात समाजात कायदा, सुव्यवस्था व शांतता अबाधित राहावी म्हणून कर्तव्याला प्राधान्य देतात. आनंदाच्या क्षणी कुटुंबीयांसोबत न राहता समाजाप्रती कर्तव्य निभावत असतात. त्यामुळे अनेक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना घरी बसलेल्या गणपतीची आरती करण्याचीही उसंत मिळत नाही. अशा वेळी प्रत्येक गणेश मंडळाने दहा दिवसातील एक तरी आरती त्यांना करण्याचा मान द्यावा, असे आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...