आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:जिल्ह्यात रोज सरासरी 72 जणांना श्वानदंश; नियंत्रणाचे उपाय शून्य

स्वप्निल सवाळे | अमरावती7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा प्रशासनाची उदासीनता, मोकाट श्वानांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी नसलेल्या परिणामकारक उपाययोजना, प्राणीमित्र संघटनांचे दडपण, कुत्र्यांना अॅण्टी रेबीज लस देण्याची थंडावलेली मोहीम, निर्बीजीकरण शस्त्रक्रियांचा अभाव यामुळे श्वानांची संख्या जिल्ह्यात दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून मागील १० महिन्यांत कुत्र्यांनी २१ हजार ६८३ नागरिकांना चावा घेतला. अर्थात एका दिवशी ७२ तर एका तासाला ३ नागरिक श्वान दंशाचे बळी ठरल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले. त्यामुळे कुुत्र्यांबद्दल शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरासह जिल्ह्यात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढल्याने चावा घेण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. गेल्या दहा महिन्यांमध्ये २१ हजार ६८३ कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या. आणखी दोन महिने शिल्लक असतानाही गेल वर्षीच्या तुलनेत यंदा हे प्रमाण १ हजार २६५ ने वाढले आहे. ज्यावेळी श्वानांना असुरक्षित वाटते. मनुष्य आपले अन्न घेणार, आपल्यावर आक्रमण करणार किंवा पाल्या पिल्लांना उचलून तर नेणार नाही ना, असे त्यांना वाटते त्यावेळी ते स्वत:च्या बचावासाठी मनुष्याला चावा घेतात, असे मत प्राणी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. श्वानांनी मनुष्याला चावा घेण्याची अनेक कारणे आहेत. विशेषत: प्रजनन कालावधीत तसेच पिलांचा जन्म झाल्यानंतर कुत्री आक्रमक बनतात. कारण आपल्याला व आपल्या पिलांना मनुष्यापासून धोका आहे, असे त्यांना वाटत असते.

गेल्या दहा महिन्यांपासून शहरासह जिल्ह्यात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला कारण त्यांची संख्या नियंत्रित करणारी प्रबळ उपाययोजनाच प्रशासनाद्वारे राबवण्यात आली नाही.

दोन वर्षात चावा घेण्याच्या २० हजारांवर घटना
गेल्या वर्षी २२९४८ तर यंदा दहाच महिन्यात २१ हजार ६८३ जणांना कुत्र्याने चावा घेतला. त्यांना तत्काळ उपचार करून घ्यावे लागलेत. एक तर मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी जिल्हा व मनपा प्रशासनाने तत्काळ पावले उचलायला हवीत तसेच त्यांना अॅण्टी रेबीज लस देण्यात यावी, त्यामुळे मनुष्य कुत्र्यांपासून सुरक्षित राहील, अशी मागणी सर्वसामान्यांनी केली आहे.

यंदा नोंदवलेल्या घटना
जिल्हा रुग्णालय - १२३८३, अंजनगाव सुर्जी - ११२७, भातकुली - ३०४, चांदूर बाजार- १३४७, चांदूर रेल्वे - ४२५, चिखलदरा- ५५, धारणी- २७०, धामणगाव रेल्वे - २७४, नांदगाव खंडेश्वर - ५१३, वरुड - ६९१ तर प्राथमिक केंद्र असलेल्या अचलपूरमध्ये- १७४६, दर्यापूर- ७८७, धारणी -६५९, मोर्शी -६४६, तिवसा - ४५६.

बातम्या आणखी आहेत...