आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • An Elderly Passenger On A Running Train Was Injured And Robbed By A Saw; The Robbers Were Caught By The Railway Police Due To Their Diligent Travel \marathi News

पोलिस कारवाई:धावत्या रेल्वेत वृद्ध प्रवाशालाआरीने जखमी करुन लुटले; दक्ष प्रवाशामुळे लुटारुंना रेल्वे पोलिसांनी पकडले

अमरावती2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नरखेडवरुन वलगाव येण्यासाठी नरखेड ते भुसावळ पॅसेंजरमध्ये प्रवास करणाऱ्या एका ६३ वर्षीय वृद्ध प्रवाशाच्या पायावर आरीने वार करुन त्याच्याकडील रोख रक्कम लुटारुंनी हिसकली. हा थरार धावत्या रेल्वेमध्ये बुधवारी (दि. १६) रात्री आठ वाजेच्या सुमारास हिवरखेड ते मोर्शी दरम्यान घडला. या प्रकाराची माहिती एका दक्ष प्रवाशाने रेल्वेतूनच पोलिसांना दिली. त्यामुळे घटनेनंतर अवघ्या पंधरा मिनिटातच रेल्वे पोलिसांनी दोन्ही लूटारुंना मोर्शीत पकडले.

सुखदेव बापुराव सहारे (३१, रा. खालनगोंदी, ता. नरखेड जि. नागपूर) आणि पंजाब बालकराव तुमडाम (५०, रा. मिरची प्लॉट, वरुड) असे पोलिसांनी पकडलेल्या लुटारुचे नाव असून, हिरालाल भीमरावजी सर्भया (६३, रा. बोरगाव पेठ, अचलपूर) असे जखमी प्रवाशाचे नाव आहे. सर्भया हे दोन ते तीन दिवसांपूर्वी शेतीच्या कामासाठी नरखेडला गेले होते. ते काम आटोपून बुधवारी सायंकाळी सर्भया नरखेड पॅसेंजरने वलगावपर्यंत येण्यासाठी बसले. दरम्यान, सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रेल्वेने हिवरखेड स्टेशन सोडले आणि रेल्वे मोर्शीकडे निघाली होती. याच दरम्यान दोन व्यक्ती सर्भया यांच्याजवळ आले व त्यापैकी एकाने त्यांच्या पायावर लाकूड कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आरीने वार केला, यामध्ये त्यांच्या पायाला दुखापत झाली व त्यांच्याजवळ असलेली दीडशे ते दोनशे रुपयांची रोख लंपास केली. तसेच रक्कम न दिल्यास रेल्वेतून ढकलून देईल, अशी धमकीसुद्धा त्याने दिली. दरम्यान, हा सर्व प्रकार सुरू असताना

बातम्या आणखी आहेत...