आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणुकीची तक्रार:कॅनरा बँकेतील कर्मचाऱ्याने खात्यातील रक्कम काढली

वर्धा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साई मंदिर परिसरातील असलेल्या कॅनरा बँकेतील शाखेत नव्याने खाते उघडण्यात आले ,आणि बँकेत पाच लाख रुपयांचा धनादेश वटवण्यासाठी दिला असता, ती रक्कम खात्यात जमा झाली नसून कर्मचाऱ्याने परस्पर काढली. रक्कम कुठे गेली याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, उडवाउडवीची उत्तरे देण्यात अाल्याने कर्मचाऱ्याच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. आर्वी येथील शेतकरी नेते शैलेश अग्रवाल यांनी १ जुलै रोजी बचत खाते काढून मुदत ठेवीसाठी ५ लाख रुपयांचा धनादेश दिला. दोन आठवडे होऊनही खाते न निघाल्याने बँकेत जाऊन माहिती घेतली असता, खरतड नामक अधिकाऱ्याने एटीएम कार्ड व नेट बँकिंग उद्या कार्यान्वित होणार असल्याचे सांगितले. वेळोवेळी बँकेत जाऊन विचारणा केल्यानंतरही रक्कम जमा झाली नाही, म्हणून पुन्हा १९ जुलै रोजी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला. मात्र, संपर्क झाला नाही. २३ रोजी कोणतेही आर्थिक व्यवहार केले नसताना ३० जुलै रोजी खात्यातून १ लाख ४० हजार १६१ रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा लघु संदेश आल्याने, बँक कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती.

बातम्या आणखी आहेत...