आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीच्या पर्वावर मारेगाव येथे दरवर्षी प्रमाणे //"भीम जयंती महोत्सव २०२३’ चे आयोजन करण्यात आले आहे. यात ११ ते १४ एप्रिल दरम्यान वैचारिक व प्रबोधनात्मक विविध कार्यक्रमाचे आयोजन ‘जय भीम उत्सव समिती, मारेगाव’च्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम. १२ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रबोधनकार विकास राजा, नागपूर यांचा बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कव्वाली. तर १३ एप्रिल रोजी प्रबोधनकार सुनिताताई कीर्तने यांचा सुद्धा प्रबोधनात्मक संगीतमय मेजवानी. हे दोन्ही कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पटांगणात आयोजित केले आहे.
तसेच १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वा. महामानवास अभिवादन तर सकाळी १० वा. प्रसिद्ध व्याख्याते चंद्रा भाऊ ठाकरे यांचे बाबासाहेबांची धम्म क्रांती या विषयावर जाहीर व्याख्यान तसेच स.११ वाजता शहरातून भव्य बाइक रॅली तर सायंकाळी ६ वाजता ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटक यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्ता डॉ. निरज वाघमारे हे आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा तसेच कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव चे प्राचार्य प्रा.डॉ. अविनाश घरडे हे आहेत. तर प्रमुख अतिथी नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की, सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेंद्र लोढा, प्राचार्य संजय तेलतुंबडे, कुंभा चे सरपंच अरविंद ठाकरे, जेष्ठ सा.कार्यकर्ता पुंडलिकराव साठे, माजी पो.पाटील तात्याजी चिकाटे तर विशेष अतिथी म्हणून तहसीलदार दीपक पुंडे, ठाणेदार राजेश पुरी, वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर, ता.आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना देठे, भा. बौ.महासभेचे ता.अध्यक्ष धर्मराज सातपुते याची प्रमुख उपस्थित राहणार आहे.
या तीन दिवसीय कार्यक्रमाचा लाभ परिसरातील तमाम समाज बांधवांनी घ्यावा असे आवाहन जय भीम उत्सव समितीचे अध्यक्ष हेमंत नराजें, उपाध्यक्ष नागेश रायपूरे, सचिव गौतम दारुंडे, कोषाध्यक्ष अनंत खाडे, सहसचिव नुतन ताई तेलंग, कार्याध्यक्ष रेखाताई काटकर, गौरव चिकाटे, ओमप्रकाश पाटील, वसुमित्र वनकर, सुवर्णा नराजें, मीना दिगाडे, अश्विनी खाडे, सपना वनकर, पुष्पा दारुंडे, आकाश भेले, सुदर्शन पाटील, आदींनी केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.