आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलादिनी कार्यक्रम:सावित्रीच्या लेकी-वेध‎ महिला कर्तृत्वाचा मुलाखत‎‎

दर्यापूर‎19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला दिनी शहरातील प्रबोधन‎ विद्यालयात ‘साावित्रीच्या‎ लेकी-वेध महिला कर्तृत्वाचा’ या‎ मुलाखत मालिकेचे आयोजन‎ करण्यात आले होते. नायब‎ तहसीलदार नीलिमा मते यांनी‎ मुलाखत मालिकेच्या पहिल्या‎ पुष्पात हजेरी लावून विद्यार्थ्यांशी‎ मुलाखतीद्वारे दिलखुलास संवाद‎ साधला. ‘वाचाल तर वाचाल‎ ’असा संदेश देत त्यांनी विद्यार्थी‎ जीवनात वाचनाचे किती महत्व‎ आहे, या विषयी सांगितले. नायब‎ तहसीलदार म्हणून पार‎ पाडावयाच्या जबाबदाऱ्यांबद्दल‎ माहिती देऊन त्यांना वाचनाचे‎ महत्त्व समजावून सांगितले.

एक‎ स्त्री म्हणून कर्तव्य बजावण्यात‎ कुठल्याही मर्यादा येत नाहीत,‎ असे मत मांडत आपण कितीही‎ मोठ्या पदावर विराजमान असलो,‎ तरीही स्वतःला व कुटुंबाला‎ ‘क्वाॅलिटी टाईम’ देऊ शकतो‎ याबाबत आग्रही भूमिका मांडली.‎ कामात कितीही व्यस्त असले तरी‎ कुटंुबाला वेळ देणे किती महत्वाचे‎ आहे, हे त्यांनी सांगितले. या‎ प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक‎ दत्तात्रय रेवसकर, उप‎ मुख्याध्यापिका शोभा भिसे,‎ पर्यवेक्षक राजकुमार बावनकुळे‎ मंचावर उपस्थित होते. आपल्या‎ आईला आदर्श व प्रेरणास्थान‎ मानणाऱ्या नीलिमा मते यांनी‎ शालेय जीवनातील‎ खोडकरपणाच्या अनेक गंमती‎ जमतींना उजाळा देऊन मुलाखतीत‎ रंगत आणली. निसर्ग कवींच्या‎ कवितेने मुलाखतीची सांगता‎ केली. या वेळी विद्यालयाच्या १५००‎ विद्यार्थ्यांनी या अभिनव उपक्रमाचा‎ आनंद लुटला.‎

बातम्या आणखी आहेत...