आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेह:आणि अंघोळ घालताना त्यांच्या लक्षात आले, हा मृतदेह आपल्या नातेवाइकाचा नाही दुसऱ्याचा आहे ; मृतदेह उचलल्यामुळे झाली गडबड

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील इर्विन रुग्णालयात आजारपणामुळे उपचारासाठी दाखल असलेल्या एका ४३ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, हा मृतदेह काही वेळासाठी शवविच्छेदन गृहात कापडात झाकून ठेवला होता. गुरुवारी (दि.२) दुपारच्या सुमारास मृताचे नातेवाइक आले व त्यांनी झाकलेला मृतदेह उचलला आणि घरी नेला. दरम्यान घरी अंत्यसंस्कारापूर्वी अंघोळ घालताना हा मृतदेह कापडातून बाहेर काढला असता तो आपल्या नातेवाइकाचा नसून दुसऱ्याचा असल्याचे समोर आले. त्यानंतर ही माहीती खोलापूरी गेट पोलिसांना दिली तसेच इर्विनमध्ये हा मृतदेह नेवून ठेवत नातेवाइकाचा मृतदेह घरी आणला. स्थानिक खोलापुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पार्वती नगर येथील ४३ वर्षीय व्यक्तीचा जिल्हा सामान्य रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक १५ मध्ये उपचार घेत असताना बुधवारी (दि. १) मृत्यू झाला. त्याचा मृतदेह इर्विनच्या शवागारात ठेवला. तर राजापेठ पोलिसांनी गुरुवारी सकाळी हद्दीत आढळलेला एका अनोळखी वृद्ध व्यक्तीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्याचा मृत्यू झाल्याने तो मृतदेहदेखील शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला. गुरुवारी दुपारी पार्वती नगर येथील मृताचे नातेवाईक मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी पोहोचले. यावेळी नातेवाइकांनी पांढऱ्या कापडात गुंडाळलेला मृतदेह तेथून घेतला. यावेळी घाईघाईत त्यांनी मृतदेहावरील कापड न काढता तो मृतदेह घरी घेऊन गेले. घरी अंत्यसंस्काराच्या प्रक्रियेदरम्यान अंघोळ करताना हा मृतदेह आपल्या नातेवाइकाचा नसल्याचे समोर आले. त्यानंतर हा मृतदेह इर्विनच्या शवविच्छेदन गृहात नेऊन ठेवला व त्यांच्या नातेवाइकांचा मृतदेह घरी आणून त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...