आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीतील घटना:महिलेचे अश्लील फोटो काढून वारंवार बलात्कार; पीडितेसह तिच्या मुलीला ठार मारण्याची धमकी

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घरामध्ये एकट्या असलेल्या एका महिलेचे लैंगिक शोषण करण्यात आले. महिलेचे अश्लील फोटो काढून त्याद्वारे पीडितेला ब्लॅकमेल करीत वारंवार अत्याचार करण्यात आला. मारहाण करुन पीडितेसह तिच्या मुलीला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. 31) रात्री उघडकीस आली. याप्रकरणी एका 25 वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.

आशिष गणेश वानखडे (25) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. आशिषने पीडित महिला घरी एकटी असताना तीचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर त्याने महिलेचे अश्लील फोटो काढले. या फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करीत आशिषने महिलेचे वारंवार लैंगिक शोषण केले. एक दिवस पीडित महिलेची मुलगी बाहेर खेळत असल्याचे पाहून आशिष पीडितेच्या घरी गेला. यावेळी त्याने घराचे दार आतून बंद करुन महिलेवर अत्याचार केले. महिलेने दार उघडण्याचा प्रयत्न केल्यावर आशिषने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पीडिता व तीच्या मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली.

आशिषच्या या सततच्या जाचाला कंटाळून महिलेने गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल दिली आहे. तक्रारीवरुन पोलिसांनी आशिषविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...