आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​ And Two Hour Stop For Water At The Gurukunj Upsa Irrigation Project Site

भजन आंदोलन:​​​​​​​गुरूकुंज उपसा सिंचन प्रकल्पस्थळी शेतकऱ्यांच्या हक्कांच्या पाण्यासाठी दिला दोन तास ठिय्या

तिवसा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या गुरुकुंज उपसा सिंचन योजना प्रकल्प स्थळी शनिवारी (दि. ५) सायंकाळी सहा वाजता माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ठिय्या आंदोलन छेडले. प्रकल्पात झालेल्या लाखो रुपयांच्या चोरीच्या घटनेबाबत संताप व्यक्त करत ठिय्या व भजन आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधले.

गुरूकुंज उपसा सिंचन योजना प्रकल्पात झालेली लाखो रुपयांच्या विद्युत साहित्याची चोरी ही अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे झाली असल्याने ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी कार्यकर्त्यांसह थेट प्रकल्प स्थळी साहित्य येईपर्यंत दोन तास ठिय्या आंदोलन व भजन आंदोलन करून प्रशासनाला व सरकारला घाम फोडला.

बातम्या आणखी आहेत...