आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार भावाची अनोखी भेट:अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, मदतनीसांना साडीचोळी अन् जेवायला पुरणाची पोळी

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले आरोग्य व जीवाची पर्वा न करता गावाची काळजी वाहणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व मदतनीस कशाचीही पर्वा न करता तुटपुंज्या मानधनात इमाने इतबारे आपले आपले कर्तव्य बजावत असतात. याच अंगणवाडी सेविकांच्या कार्याची दखल घेत दर्यापूर-अंजनगाव सुर्जी मतदार संघाचे आमदार बळवंत वानखडे दरवर्षी तालुक्यातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व मदतनीस यांच्यासोबत भाऊबीज उत्सव साजरा करीत असतात. या वर्षीदेखील हा उत्सव साजरा करीत त्यांना साडीचोळीच्या भेटीसह पुरण पोळीचे जेवण देत त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले.

दिवाळीच्या निमित्ताने भाऊबीज भेट म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला आमदार बळवंतराव वानखडे यांचा तालुक्यातील आशा वर्कर व अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्याकरिता भाऊबीज भेट कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात शहरातील शुभम मंगल कार्यालयात आनंद व उत्साहात पार पडला.

आमदार बळवंत वानखडे यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या या भाऊबीज कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब हिंगणीकर, समाजसेवक रामुशेठ मालपाणी, गजानन जाधव, सुनील गावंडे, अ‌ॅड. अभिजित देवके, संजय बेलोकार, ईश्वर बुंदीले, प्रदीप देशमुख, विनोद पवार, गजानन देवतळे, शशांक धर्माळे, डॉ. राजेंद्र रहाटे, डॉ. गव्हारे, प्रशांत अढाऊ, सीता वानखडे, मंदा वानखडे, डॉ.आश्विनी देवके, जयश्री चव्हाण, अनुराधा खारोडे, प्रकाश चव्हाण, अनिल बागडे, रामेश्वर तांडेकर, निशिकांत पाखरे, अस्लम घाणीवाले, जम्मू पठाण आदी उपस्थित होते.

या प्रसंगी तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर यांना आमदारांच्या वतीने साडी व चोळीची भेट देण्यात आली. कार्यक्रमादरम्यान सुधाकर भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक आ. बळवंत वानखडे यांनी करीत या भाऊबीज सोहळ्याच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. ज्ञानेश्वर मेश्राम यांनी केले. या भाऊबीज सोहळ्याच्या यशस्वीतेकरिता आमदार बळवंत वानखडे मित्र परिवारातील सदस्य यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...