आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:अंगणवाडी सेविकांचा निघाला कलेक्टर कचेरीवर छत्री मोर्चा; शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा

अमरावती20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात तातडीने वाढ करण्यात येऊन त्यांना शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, या करिता शेकडो अंगणवाडी सेविकांचा ‘इंटक’च्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन) ते जिल्हा कचेरीपर्यंत छत्री मोर्चा काढण्यात आला. सोबतच जिल्हाधिकारी कार्यालय मुख्य प्रवेशद्वारासमोर तीव्र निदर्शने केली. त्याशिवाय अंगणवाडी सेविकांचे प्रलंबित प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यात याव्या, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना अतिशय तोकडे मानधन दिल्या जाते. या महिला कर्मचाऱ्यांना आपल्या मुलांचे पालन पोषण करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता व मागण्या तातडीने पुर्ण होण्याकरता भव्य छत्री मोर्चा काढण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविकांनी केंद्र व राज्य सरकार विरोधात घोषणा दिल्या. तसेच अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांचे मासिक १८ हजार रुपये तर मदतनीस यांचे मासिक मानधन १५ हजार रुपये तातडीने देण्यात यावे. त्याशिवाय कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ काम देऊन त्यांना शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्याचा देण्यात यावा, यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले

बातम्या आणखी आहेत...