आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्रक्रियेनंतर मृत्यू:इर्विन पीडीएमसीमध्ये संतप्त नातेवाइकांचा डॉक्टरांवर आरोप

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा सामान्य रुग्णालयात अपघातग्रस्त महिलेचा शस्त्रकियेनंतर काही वेळातच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. ३०) घडल्यानंतर संतप्त नातेवाइक व शिवसैनिकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. २५ सप्टेंबरला कल्पना गंगाधर मेशकर या महिलेसह १६ महिला ब्राम्हणवाडा थडी ते वणी बेलखेडा रस्त्याने मजुरीसाठी ऑटोने शेताकडे जात होत्या.

फुफ्फुसामध्ये रक्ताची गाठ झाल्यामुळे मृत्यू
या महिलेवर शस्त्रक्रिया झाली, त्यानंतर महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेच्या म़ृतदेहाचे शवविच्छेदन केले असून अहवाल यायचा आहे. मात्र प्राथमिक अंदाजानूसार महिलेच्या फुप्फुसामध्ये रक्ताची गाठ झाली व त्यामुळे मृत्यू झाला असावा, असे समोर आले आहे. -डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती.

पीडीएमसी रुग्णालयात ५ वर्षीय बालकाचा मृत्यू
अमरावती

नांदुरा येथील पाच वर्षीय बालकाला डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, शनिवारी सकाळी उपचारादरम्यान बालकाचा मृत्यू झाला. सिद्धांत देविदास मोरे (वय ५) असे बालकाचे नाव आहे. मात्र, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सिद्धांत याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. त्यामुळे संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयात चांगला गोंधळ घातला.

बालक आधीच गंभीर स्थितीत होते
पाच वर्षीय बालकाची या आधी शस्त्रक्रिया झाली होती. त्याला पंजाबराव देशमुख रुग्णालयात काही दिवसांपूर्वी उपचारासाठी रेफर केले होते. बालक आधीच गंभीर परिस्थितीत होता. त्यामुळे येथील डॉक्टरांकडून उपचार करताना कोणताही हलगर्जीपणा झालेला नाही. -डॉ. अनिल देशमुख, अधिष्ठाता, पीडीएमसी, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...