आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदगाव तालुक्यातील कृषी पंपाचा वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे संतप्त शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांच्या दालनात ठिय्या दिला. यावेळी शेतकऱ्यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधीक्षक अभियंता खानंदे यांनी शेतकऱ्यांची सर्व बाजू समजून घेतली व रोहित्र बसवणे व इतर समस्या तात्काळ सोडवण्याचे लेखी आश्वासन दिले.
त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.रब्बी हंगामाच्या पिकांची पेरणी होऊन एक महिन्याचा कालावधी होत असून नांदगाव तालुक्यातील कृषी पंपाचे शेकडो रोहित्र बंद असल्याने शेतकऱ्यांच्या हरभरा व गहू पिकाला पाणी पुरवठा न झाल्याने पिके सुकण्याच्या मार्गावर आहे. तसेच मांजरी म्हसला, सातरगाव, आडगाव या भागातील रोहित्र दोन वर्षांपासून बंद आहे. शेतकऱ्यांचे पीक सुकून लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
शेतकरी विवंचनेत सापडला आहे. शेतकऱ्यांचे आधीच अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात मुबलक पाणी असतानाही वीजपुरवठ्या अभावी पिकाला पाणी मिळत नाही. वेळीअवेळी वीजपुरवठा विस्कळीत होतो. तसेच सिंगल फेजलाइन अनेक महिन्यापासून मिळत नाही. शेकडो रोहित्र ओव्हरलोड असतांना वर्षानुवर्षे नवीन रोहित्र बसवण्यात आले नसल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे.
पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची थट्टा चालवल्याचा आरोप
एआयसी पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम न मिळाल्याने बुधवारी संतप्त शेतकऱ्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेतृत्वात कृषी अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यावेळी पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा चालवली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम दहा दिवसांमध्ये जमा करावी, अन्यथा अधिकाऱ्यांसह कार्यालय फोडू, असा इशारा यावेळी शिवसेनेने दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.