आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघात निवड:भातकुली येथील अंजली पाचडे हिची विद्यापीठ संघात निवड

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा जोतिबा फुले वाणिज्य, विज्ञान आणि विठ्ठलराव राऊत कला महाविद्यालय भातकुली येथील बीए भाग १ची विद्यार्थिनी अंजली पाचडे यांची जम्मू विद्यापीठ येथे २० ते २३ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ऑल इंडिया तलवारबाजी स्पर्धेकरिता निवड झाली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन तलवार बाजी स्पर्धा टोंपे महाविद्यालय चांदूर बाजार घेण्यात आली.

या स्पर्धेत अंजलीने उत्कृष्ठ प्रदर्शन करून महाविद्यालयाचे नावलौकिक केले आहे. अंजली पाचडेला शारीरिक शिक्षण संचालक डॉ. पी. व्ही. राऊत यांचे मार्गदर्शन लाभले आहे. अंजलीची निवड झाल्याने तिचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...