आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्वजनिक बांधकाम विभाग:अंजनगाव - दर्यापूर मार्गाभोवती हिरवाई दाटणार ; मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड

अंजनगाव सुर्जीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंजनगाव सुर्जी ते दर्यापूर या मार्गाचे मागील दोन-तीन वर्षांत नूतनीकरण झाले असून, या नूतनीकरणात रस्त्याच्या दुतर्फा असलेले सर्व वृक्ष तोडले होते. त्यामुळे या मार्गावर वृक्ष नसल्याने संपूर्ण रस्ता भकास झाला होता. प्रवाशांना ऊन, वारा, पावसापासून बचाव करण्यासाठी झाडे नव्हती. मात्र काम होताच सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली असून, अजूनही वृक्ष लागवडीचे काम सुरूच आहे. त्यामुळे आता हा मार्ग हिरवळीने समृद्ध होणार असल्याने या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

नूतनीकरणानंतर रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या झाडांची योग्य निगा राखली जात असल्याने ती जोमाने वाढत आहेत. त्यामुळे या मार्गावर बऱ्याच ठिकाणी हिरवळ दिसत असून, या झाडांची सावली प्रवाशांना आधार देत अाहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. वृक्ष लागवडीचे काम अद्यापही सुरूच आहे. या रस्त्यावर पुन्हा मोठ्या प्रमाणात वृक्ष लावल्याने संपूर्ण रस्त्यावर प्रसन्नता निर्माण झाली अाहे. रस्त्याच्या नूतनीकरणासाठी तोडलेल्या वृक्षांच्या जागी नवीन झाडे लावून सार्वजनिक बांधकाम विभागाने भकास झालेल्या रस्त्यावर पुन्हा हिरवळ निर्माण केली. याबाबत चालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

वृक्ष जगवण्यासाठी उपाययोजना : आतापर्यंत या मार्गावर २७०० च्या वर झाडे लावले असून, ती जगवण्यासाठी वृक्षांना नियमित टँकरद्वारे पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. जे वृक्ष काही कारणास्तव जगले नसतील त्या ठिकाणी पुन्हा नवीन वृक्ष लावण्याची तयारी केल्याचे वेल्समन एंटरप्रायझेस लि. या कंत्राटदार कंपनीचे अभियंता आशिष ग्रिड यांनी दिली.

प्रवाशांसाठी सावलीचा आधार प्रवास करत असताना बऱ्याच प्रवाशांना थकवा जाणवत असतो. त्यामुळे कुठेतरी थांबावे व थोडा आराम करावा, असा विचार त्यांच्या मनात येतो. मात्र या मार्गावर गेल्या दोन-तीन वर्षांत झाडे तोडल्यामुळे कुठेच थांबण्याची सोय नव्हती, परंतु आता नव्याने लागवड केलेल्या झाडांमुळे प्रवाशांना कुठेतरी आधार मिळत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वृक्ष अंजनगाव सुर्जी ते दर्यापूर या नूतनीकरण केलेल्या रस्त्याच्या दुतर्फा पर्यावरण संवर्धन व निसर्गाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने वृक्ष लागवड करण्यात आली. त्याची देखभाल करण्याची जबाबदारी वेल्समन एंटरप्रायझेस लि. या कंत्राटदार कंपनीला दिली आहे. - प्रतिक गिरी, कार्यकारी अभियंता, साबांवि, दर्यापूर.

बातम्या आणखी आहेत...