आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील किसान जिनिंग अॅण्ड प्रेसिंग सहकारी संस्थेच्या संचालक पदाचा निवडणुकीचा निकाल घोषित झाला असून त्यात सहकार पॅनलने परिवर्तन पॅनेलला मात देत आपले वर्चस्व मिळवले. सहकारावरच्या वर्चस्वाच्या या निवडणुकीमध्ये सहकार व परिवर्तन या दोन पॅनलमध्ये अटीतटीची लढत झाली. संचालक पदाच्या १९ जागांच्या निवडणुकीसाठी दोन्ही पॅनलमधील दिग्गज एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. त्यामुळे या निवडणुकीला तालुक्यात चांगलेच महत्त्व प्राप्त झाले होते. १९ संचालक मंडळाच्या निवडणुकीत वैयक्तिक मतदार संघातून ७, सहकारी संस्था मतदार संघातून ७, महिला मतदार संघातून २, इतर मागासवर्गीय मतदार संघातून १, भटक्या विमुक्त जमातीमधून १, अनु/जाती जमातीमधून १ असे उमेदवार निवडूण द्यावयाचे होते.
त्यामध्ये सहकार पॅनलचे ११ व परिवर्तन पॅनलचे ८ उमेदवार निवडूण आले असून, सर्वसाधारण प्रतिनिधी वर्गातून सहकार पॅनलचे एक वगळून सर्व उमेदवार, तर सेवा सहकारी संस्थेमधून परिवर्तन पॅनलचे सर्व प्रतिनिधी निवडूण आले. त्यामुळे जिनिंग प्रेसिंगवर आपले वर्चस्व राहावे, यासाठी आणि निवडून येण्यासाठी चांगलीच फिल्डींग लावली होती. या मतमोजणीच्या वेळी क्राॅस व्होटिंग करणाऱ्यांची संख्या वाढलेली आढळली. एकूण १५९७ मतापैकी १३७ मते अवैध ठरली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गणेश कुकडे यांनी काम पाहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.