आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:अंजनगाव सुर्जी, दर्यापुरात काँग्रेसचे महागाईच्या विरोधात तीव्र निदर्शने

दर्यापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत कार्यकर्त्यांची प्रचंड घोषणाबाजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार असून सातत्याने महागाईत प्रचंड वाढ करून सामान्य जनतेची लयलूट सुरू आहे. महागाई मुक्त भारत अभियानांतर्गत दर्यापूर तालुका काँग्रेसने शुक्रवारी बसस्थानकासमोरील शिवाजी चौकात रस्त्यावर उतरून सिलिंडर व दुचाकी वाहनाला हार घालून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुका संपताच पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस सिलिंडर व सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे व घर बांधकाम साहित्याची दरवाढ करून जनतेची लूट सुरू केली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, खाद्य तेलासह अन्य जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांना महागईची झळ पोहोचत आहे. केंद्र शासनाच्या या धोरणाविरोधात आमदार बळवंत वानखडे, तालुकाध्यक्ष सुधाकर भारसाकळे, माजी जि. प. सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

या वेळी तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या विविध सर्व सेलचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, मोदी सरकारचा निषेध व्यक्त करत प्रचंड घोषणाबाजी केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...