आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंजनगाव सुर्जी येथे पिस्तुलासह 6 जीवंत काडतूस जप्त:5 दिवसातील दुसरी घटना, शहरात खळबळ

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिस्तुल व जीवंत काडतुसांसह ताब्यात घेतलेला युवत व तपास पथक. - Divya Marathi
पिस्तुल व जीवंत काडतुसांसह ताब्यात घेतलेला युवत व तपास पथक.

अवघ्या चार दिवसात येथील पोलिस ठाण्यांतर्गत पुन्हा एकदा एक पिस्तुल व सहा जीवंत काडतुस पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी रिजवान उर्फ साेनू अहमद खान (26) रा. पानअटाई, खिडकीपुरा याला ताब्यात घेतले.

4 डिसेंबरला पोलिसांनी मोहम्मद नावेद उर्फ गुड्डू अब्दुल सलीम (30) याला ताब्यात घेत त्याच्या जवळून लखाड येथून तीन पिस्तुलांसह आठ जीवंत काडतूस जप्त केले होते. पोलिसांना शहरातील रिजवान खान याच्याकडे पिस्तुल व काडतुस असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता, त्याने भीतीपोटी पिस्तुल व काडतुस अंजनगाव ते परतवाडा मार्गावरील गळती गावाजवळील ताेफ नाल्यावरील पुलाच्या खाली लपवली असल्याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी ताेफ नाल्यावरील पुलाच्या खालून एका पिस्तुलासह सहा काढतूस शोधून काढली. सलग चार दिवसांच्या अंतराने शहरात पुन्हा पिस्तुल व जीवंत काडतूस आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय अधिकारी पोलिस सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार दीपक वानखडे, सपोउनि उल्हास राठोड, पोलीस कर्मचारी विजय शेवतकर, कमलेश मुराई, जयसिंग चव्हाण, विशाल थोरात, शुभम मारकड, देवानंद पालवे यांनी केली.

शहरातील खिडकीपुरा परिसरात राहणाऱ्या रिजवानला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, माझ्याकडे पिस्तुल होती. परंतु, पोलिसांनी चार दिवसांपुर्वी केलेल्या कारवाईनंतर भीती वाटल्यामुळे ती फेकून दिली असल्याची माहिती त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगीतले.

शहरात आठवडाभरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून शहरात पिस्तुल व काडतूस येतात कुठून त्याचा शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...