आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती साजरी:नांदगाव येथे भगवान परशुराम यांची जयंती साजरी; इतर समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेची पूजा केली

नांदगाव खंडेश्वर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी येथे ब्राम्हण समाज बांधव तसेच इतर समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेची पूजा केली.

विलास वितोंडे प्रभाग क्र.९ यांच्या घरी सर्वांनी एकत्र येऊन भगवान परशुराम यांच्या प्रतिमेला हार व फुले चढवली. या वेळी उपस्थित समाज बांधवांनी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक नरहरी पाठक. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप जोशी, माजी न.प. अध्यक्ष संजय पोफळे, भाजप जिल्हा सरचिटणीस राजेश पाठक, प्रशांत वैद्य, राजेश दिवेकर, विनायक गावफळे, डॉ. हेमंत देशमुख, आनंद कोरान्ने, पवन जोशी, आशिष गुलालकरी, विनय लाखणे, सुरेश तिवारी, पी. एस. पांडा, उमाकांत तिवारी, विवेक पाठक, प्रवीण तिवारी, स्नेहल तिवारी, पंकज पाठक यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते

बातम्या आणखी आहेत...