आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन; चित्रा चौकात विविध पक्ष, सामाजिक संघटना, नागरिक झाले नतमस्तक

अमरावतीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती शहरात साजरी करण्यात आली. यावेळी शहरातील शाळा, सामाजिक संस्थांतर्फे विविध उपक्रमांच्या माध्यमातून जोतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले. तसेच चित्रा चौक येथील महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासून विविध पक्ष, संघटना एकत्र आल्या होत्या.

सत्यशोधक समाजाचे संस्थापक व महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे विचारवंत व समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांनी बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि जातिभेद पाहून सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. पुण्यात मुलींची पहिली शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचे समाजाप्रती विशेष योगदान आहे.

महात्मा फुले यांची शहरात विविध सामाजिक कार्यक्रम, उपक्रम राबवून जयंती साजरी करण्यात आली. शहरातील चित्रा चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी विविध पक्ष, संघटनासह नागरिक एकत्र येऊन नतमस्तक झाले. यावेळी अभिवादन करण्यासाठी प्रहार, भीम ब्रिगेड, भीम आर्मी, आझाद समाज पार्टीसह इतर पक्ष संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.