आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव उद्यापासून:14 ऑक्टोबरला होणार भावस्पर्शी व शिस्तबद्ध मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अखिल विश्वाला मानवतेचा संदेश दिला. क्रांतीदर्शी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 54 वा पुण्यतिथी महोत्सव अर्थात सर्व संत स्मृती मानवता दिवसाला शनिवारपासून (दि. 8) गुरूकुंज मोझरी येथे प्रारंभ होत आहे. हा महोत्सव 15 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

अत्यंत भावस्पर्शी व शिस्तबद्ध मौन श्रद्धांजलीचा हृदयस्पर्शी कार्यक्रम शुक्रवारी (दि. 14) होणार आहे. यावेळी राज्यातील संत-महंत, परदेशी पाहुणे, गुरूदेव भक्त व राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. शनिवारी (दि. 15) गोपालकाला व व्यायाम प्रात्यक्षिकाच्या सादरीकरणाने पुण्यतिथी महोत्सवाची सांगता होईल.

शनिवारी पहाटे साडेचार वाजता महासमाधीजवळ तीर्थस्थापना व चरण पादुका पूजनाने महोत्सवाला सुरूवात होईल. राजेंद्र कठाळे, सुभाष नेमाडे, वासुदेव कुरवाडे, राजेंद्र चव्हाण हे अखंड विणा वादनास प्रारंभ करतील. त्यानंतर मानकर स्वामी (आळंदी) यांच्या संयोजनाखाली राष्ट्रसंतांच्या प्रतीमेची शोभायात्रा काढण्यात येईल. दैनंदिन कार्यक्रमांना पहाटे साडेपाच वाजता सामुदायिक ध्यानाने प्रारंभ होईल.

शंकर महाराज, विठ्ठलदास काठोळे, अ‍ॅड. सचिन देव, सीमा तायडे, विजयादेवी, रामप्रियाजी, प्रकाश वाघ सामुदायिक ध्यानावर चिंतन करतील. सकाळी सात वाजता योगाचार्य तुळशीदास कपाळे योगासन व प्राणायमाचे प्रशिक्षण देतील. आठ वाजता अमृता कडुकर, सुधीर बोराळे, निळकंठ हळदे, रामदास चारोडे, राम मरकाडे, दिलीप कोहळे ग्रामगीता प्रवचन करतील.

राज्यस्तरीय कीर्तन स्पर्धा

सकाळी 9 वाजता राज्यस्तरीय कीर्तन स्पर्धा होईल. सायंकाळी सहा वाजता सामुदाियक प्रार्थना व प्रार्थनेच्या महत्त्वावर संकेत काळे, कैलास दुरतकर, डॉ. प्रशांत ठाकरे, निलेश गावंडे, पुष्पा बोंडे, आनंददेव स्वामी, उपसर्वाधिकारी लक्ष्मण गमे चिंतन करतील. .

दोन वर्षे साध्या पध्दतीने झाला महोत्सव

कोरोना निर्बंधामुळे सलग दोन वर्षे पुण्यतिथी महोत्सव साजरा करता आला नाही, परंतु आता निर्बंध नसल्यामुळे सर्वधर्म समभावाचे प्रतीक असणाऱ्या श्रीक्षेत्र गुरूकुंज येथे राष्ट्रसंतांच्या या पुण्यतिथी महोत्सवाला पहाटे साडेचार वाजता तीर्थ स्थापनेने प्रारंभ होईल.

बातम्या आणखी आहेत...