आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Annual Grant By Municipal Corporation To Disabled Persons; 5 Percent Of The Annual Budget For Disabled Persons Above 18 Years Of Age | Marathi News

शिष्यवृत्ती:दिव्यांगांना मनपातर्फे वार्षिक अनुदान ; 18 वर्षांवरील दिव्यांगांसाठी वार्षिक बजेटमध्ये 5 टक्के निधी

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महानगर पालिकेद्वारे वार्षिक बजेटमध्ये ५ टक्के निधी दिव्यांग कल्याणासाठी राखीव ठेवला जातो. त्यातून १८ वर्षांपासून ते ५५ वर्षांपर्यंतच्या दिव्यांगांना प्रत्येकी १० हजार रु. अनुदान दिले जाते. यात १५ ते १८ वर्षांपर्यंतच्या दिव्यांगांसाठी काही करता येणार काय, याचा विचार केला जाईल, असे मनपा आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. कारण दिव्यांग शालेय विद्यार्थ्यांना मनपाद्वारे आधीपासूनच शिष्यवृत्ती दिली जात आहे.

शहरातील ५५ वर्षांवरील दिव्यांगांना वार्षिक ९ हजार रुपये अनुदान दिले जाते. विशेष बाब म्हणजे ज्यांचे आधीपासूनच स्वत:चे दुकान किंवा व्यवसाय आहे, अशांना २० हजार रुपये वार्षिक आर्थिक मदत केली जाते. केवळ दिव्यांगांनाच नव्हे तर मतिमंद, कुष्ठरोगी यांनाही वार्षिक ९ हजार रुपये मदत मिळते. तसेच एका घरात जर एकापेक्षा जास्त दिव्यांग असतील तर प्रत्येक दिव्यांगाला ९ हजार रु. अनुदान दिले जाते.

दिव्यांगांना जीवन जगताना येणाऱ्या अडचणी समजून सामाजिक बांधिलकीतून त्यांचे अनुदान ५ हजारावरून एक वर्षांआधी ९ हजारापर्यंत वाढविण्यात आले. शालेय दिव्यांग विद्यार्थी प्राथमिक शाळेपासून ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांपर्यंत ३ ते ३० हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जात आहे.

दिव्यांगाना ३० हजारापर्यंत मदत : शहराचे नाव राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना ३० हजारापर्यंत मदत मनपाद्वारे केली जाते. राज्य स्तरावरील खेळाडूला १० हजार, राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूला २० हजार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग व चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला३० हजार रुपये मदत केली जाते.

बातम्या आणखी आहेत...