आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून जाहीर:लासलगाव बाजार समिती राज्यात प्रथम, हिंगणघाट दुसरी

अमरावती21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत (स्मार्ट) राज्यभरातील बाजार समित्यांची त्यांच्या कामगिरीच्या आधारे वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील एकूण ३०५ बाजार समित्यांपैकी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीने पहिला, विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटने दुसरा तर वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड बाजार समितीने तिसरा क्रमांक पटकावला आहे. स्मार्ट प्रकल्पांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांपैकी राज्यातील बाजार समित्यांची त्यांच्या कामगिरीच्या आधारे वार्षिक क्रमवारी प्रसिद्ध करणे, हा महत्त्वाचा उपक्रम आहे. ही क्रमवारी निश्चित करण्यासाठी पणन संचालनालय कार्यालयाकडून जागतिक बँकेच्या सूचनेनुसार तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्री व्यवस्थेवर बाजार समितीत असलेल्या एकूण ३५ निकषांची पडताळणी केल्यानंतर या बाजार समित्यांची कामगिरी ठरवली गेली.

राज्यातील पहिल्या दहा बाजार समिती व मिळालेले गुण समिती जिल्हा गुण क्रमांक लासलगाव नाशिक १६३ १ हिंगणघाट वर्धा १६१.५० २ कारंजा लाड वाशिम १६१ ३ संगमनेर नगर १५७ ४ मंगरुळपीर वाशिम १५७ ४ चांदूर बाजार अमरावती १५७ ४ वाशीम वाशिम १५७ ४ काटोल नागपूर १५६ ५ अकोला अकोला १५५ ६ उमरेड नागपूर १५५ ७ लातूर लातूर १५० ८ बारामती पुणे १४९.५० ९ पिंपळगाव ब. नाशिक १४८.५० १०

बातम्या आणखी आहेत...