आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:एमडी ड्रग्ज प्रकरणात आणखी एकाला अटक

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने शनिवारी सायंकाळी नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील गवळीपुऱ्यातून एमडी ड्रग्जची चिल्लर विक्री करणाऱ्याला पकडले होते. दरम्यान, त्याने हा माल ज्याच्याकडून विक्रीसाठी घेतला होता, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनाही रविवारी (दि. ११) न्यायालयासमोर हजर केले असता दोन्ही आरोपींना १३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

शेख बब्बू शेख सुलेमान (४२, अन्सारनगर) याला अटक केल्यानंतर त्याने हे एमडी नईम ऊर्फ राजा वल्द शेख रहीम ऊर्फ होंगा (२४, गवळीपुरा) याच्याकडून विक्रीसाठी आणले असल्याचे सांगितले. त्यामुळे शनिवारी उशिरा रात्रीच पोलिसांनी नईमलाही अटक केली आहे. विशेष पथकाचे प्रमुख एपीआय योगेश इंगळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...