आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याचा मृत्यू:सेमाडोह परिक्षेत्रात आणखी एका बिबट्याचा मृत्यू

चिखलदरा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेमाडोह वनपरिक्षेत्रात एका मागून एक नर व मादी बिबट्याच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे.मंगळवारी सेमाडोह ते रायपूर मार्गावर नर बिबट्याचा मृत्यू झाला, तर सायंकाळी उशिरा त्याच्यापासूनच काही अंतरावर मादी बिबट्याचा मृतदेहदेखील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आला.

त्यामुळे वनविभागाने तपासाची गती वाढवली असून अमरावती येथून सायबर सेलची चमूसुद्धा मेळघाटात दाखल झाली आहे. हातरू व चौऱ्या कुंड भागात बारकाईने तपास सुरू आहे. अशा प्रकारची घटना होणे ही मेळघाट व्याघ्र प्रकल्पासाठी‎ धक्कादायक आहे.

मृतक मादी बिबट दीड वर्षाची‎ असून तिच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या घाव‎ किंवा खुणा नाहीत, तसेच कातडीवर सुद्धा कुठल्याही‎ प्रकारच्या खुणा नाहीत. त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात‎ आला असावा, अशी शक्यता सेमाडोहचे वनपरिक्षेत्र‎ अधिकारी सम्राट मेश्राम यांनी वर्तवली आहे.

बातम्या आणखी आहेत...