आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:ब्राम्हण समाजविरोधी वक्तव्य; भाजपच्या जिल्हाध्यक्षांविरुद्ध भाजयुमोचीच तक्रार

परतवाडा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतवाडा शहरातील एका हॉटेलमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी-दिघडे यांनी सोमवारी ब्राम्हण समाजविरोधी वक्तव्य केल्याचे म्हणत परतवाडा भाजयुमोचे उपाध्यक्ष चेतन पुरोहित यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी २९५ अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील सूर्यकमल हॉटेल येथे जिल्ह्यासह अचलपूर तालुका व शहरातील भाजप पदाधिकारी उपस्थित होते. या दरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी ब्राम्हण समाजविरोधी अशोभनीय वक्तव्य केल्याचा आरोप चेतन पुरोहित यांनी केला आहे.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, २ मे रोजी दुपारी ३ ते ३.३० च्या सुमारास जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांच्या समवेत मी व माझे काही सहकारी बसलो असता मला उद्देशून चौधरी यांनी अतिशय अभद्र शिवीगाळ केली. साक्षीदार म्हणून ॲड. श्यामसिंह गड्रेल, प्रफुल्ल कुऱ्हेकर, राम बघेल, ललित ठाकूर, नितीन कुरोटीया, निगम बडगुजर, नितीन चिकटे उपस्थित होते. पोलिसांत तक्रार देताना अक्षय पाठक, मनीष शर्मा, रिंकू शुक्ला आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...